शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खेळायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् २९ तासांनी ७ वर्षीय मुलाचा मृतदेहच सापडला

By नारायण बडगुजर | Updated: September 10, 2022 06:54 IST

आदित्य हा गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून इमारतीच्या खाली आला होता. त्यानंतर तो दिसून न आल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध सुरू केला.

पिंपरी : खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेला मुलगा बेपत्ता झाला. ही घटना गुरुवारी (दि. ८) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. त्यानंतर अपहरण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता शुक्रवारी (दि. ९) रात्री उशिरा मुलाचा मृतदेह मिळून आला. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

आदित्य गजानन ओगले (वय ७) असे खून झालेल्या अपहृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील गजानन श्रीकांत ओगले (वय ४९, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी आदित्यचे अपहरण झाल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळायला जातो असे सांगून आदित्य हा गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून इमारतीच्या खाली आला होता. त्यानंतर तो दिसून न आल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध सुरू केला. मात्र शोध लागला नाही. त्यामुळे आदित्य याच्या आई वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका संशयित तरुणाकडे कसून चौकशी केली. त्यावेळी आदित्य याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आदित्य याचा मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर मिळून आला. 

२० कोटी रुपयांची मागणीमयत आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आदित्य हा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना फोनवरून २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे हा अपहरणाचा प्रकार असल्याचे सांगितले जाते. मात्र, पोलिसांना यामध्ये वेगळाच संशय येत आहे. कारण, आरोपी आणि मयत मुलगा आदित्य एकाच सोसायटीत राहत होते.

पोलिसांचा २९ तास तपासआदित्य हा बेपत्ता असल्याचे माहित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पिंपरी पोलीस ठाण्याचे स्थानिक तपास पथक तसेच गुन्हे शाखेचे गुंडाविरोधी पथक व इतर पथकांकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. या तपासात २९ तासांनंतर आदित्यचा मृतदेह मिळून आला.

टॅग्स :Kidnappingअपहरण