शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलवर सट्टा घेणाऱ्याला केले जेरबंद; राजापेठ डीबीची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: May 9, 2024 20:21 IST

दोन आरोपी घटनास्थळाहून पसार झाले. २० मार्चपासून सुरू झालेल्या यंदाच्या आयपीएल हंगामातील ही पहिली कारवाई ठरली आहे.

अमरावती : आयपीएलमधील लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद या संघामध्ये ८ मे रोजी खेळविल्या गेलेल्या सामन्यावर सट्टा खाणाऱ्या एकाला राजापेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला. विशाल शिवनारायण निर्वाण (२४, रा. अंबागेट, अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन आरोपी घटनास्थळाहून पसार झाले. २० मार्चपासून सुरू झालेल्या यंदाच्या आयपीएल हंगामातील ही पहिली कारवाई ठरली आहे.             पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आयपीएल जुगारावर प्रतिबंध घालण्याचे आदेश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. बरहुकूम राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांच्या मार्गदर्शनात डीबी प्रमुख मनीष करपे यांच्या पथकाने ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता शंकरनगर स्थित कॅन्सर हॉस्पिटलसमोर ही कारवाई केली. तेथे एक इसम हा लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद या क्रिकेट सामन्यावर मोबाइल फोनच्या साहाय्याने बेटिंग घेऊन जुगार खेळत असल्याची माहिती करपे यांना मिळाली होती. त्यानुसार तेथून विशाल निर्वाण याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोबाइल व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध फसवणुकीसह इंडियन टेलिग्राफ ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

...यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांच्या नेतृत्वात सीआययू पथकप्रमुख तथा सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, जमादार मनीष करपे, पंकज खटे, विजय राऊत, रवी लिखितकर, गणराज राऊत, सागर भजगवरे, सुनील लासुरकर, विनय मोहोड, विनोद काटकर आदींनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी