शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:15 IST

यापूर्वी तिने कुठे प्रवास केला होता व तस्करी केली होती का, याचा तपास अधिकारी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बिस्कीट आणि चॉकलेटच्या बॉक्समधून तब्बल ६० कोटी ६० लाख रुपयांच्या कोकेनच्या तस्करीप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एका भारतीय महिलेला मुंबई विमानतळावर अटक केली आहे. ती दोहा येथून मुंबईत आली होती. 

ही महिला अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडे होती. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी संबंधित महिला ज्या विमानाने येणार होती त्या विमानाबाहेर सापळा रचला होता. ही महिला विमानातून उतरल्यानंतर तिच्या लगेजची तपासणी केली असता त्यात बिस्किटांचे सहा बॉक्स आणि तीन चॉकलेटचे बॉक्स सापडले. त्यामध्ये ३०० कॅप्सूलमध्ये ६२६१ ग्रॅम कोकेन लपवले होते.

या तस्करीसाठी या महिलेला मोठी रक्कम मिळणार होती, तसेच मुंबईत उतरल्यानंतर तिला हे अमली पदार्थ घेण्यासाठी एक व्यक्ती संपर्क करणार होती, असे तिने अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितले. दरम्यान, यापूर्वी तिने कुठे प्रवास केला होता व तस्करी केली होती का, याचा तपास अधिकारी करत आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ