शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Indian Navy : नौदलाची मोठी कामगिरी; २ हजार कोटींचं ड्रग्स जप्त, पाकिस्तानमार्गे भारतात आणण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 20:13 IST

भारतीय नौदलाची मोठी कामगिरी. हे ड्रग्स २ हजार कोटींचे असल्याचं सांगितलं जात आहे.

भारतीय नौदलाला शनिवारी मोठं यश मिळालं. पाकिस्तानातून समुद्रामार्गे भारतात आणलं जाणाऱ्या ड्रग्सची मोठी खेप नौदलानं गुजरातनजीक पकडली. या पकडलेल्या ड्रग्सची किंमत २ हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. या वर्षांची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाला या संदर्भात गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळून ड्रग्जची खेप पकडली. पाकिस्तानातून मासेमारी करणाऱ्या बोटीतून अंमली पदार्थांची खेप भारतात आणली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.  यापूर्वी पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर रेडिओॲक्टिव्ह पदार्थ आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. परदेशी मालवाहू नौकेतून अनेक कंटेनर्स जप्त करण्यात आले होते. माहिती न देता धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीच्या संशयातून ते जप्त करण्यात आले होते. तसंच मुंद्रा पोर्टवर १६ सप्टेंबर २०२१ रोजी ३ हजार किलोग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. अफगाणिस्तानातून इराणमार्गे ते भारतात पाठवण्यात आले होते. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली होती.

टॅग्स :Gujaratगुजरातindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान