शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विंडीज आव्हान देण्यास सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 05:22 IST

भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान कृत्रिम प्रकाशझोतात लढत होत असल्यामुळे मला २५ वर्षांपूर्वीच्या ‘हीरो कप’ स्पर्धेची आठवण झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या लढतीत भारतात प्रथमच फ्लडलाईट आणि रंगीत कपड्यात सामना खेळला गेला.

- सौरव गांगुली भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान कृत्रिम प्रकाशझोतात लढत होत असल्यामुळे मला २५ वर्षांपूर्वीच्या ‘हीरो कप’ स्पर्धेची आठवण झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या लढतीत भारतात प्रथमच फ्लडलाईट आणि रंगीत कपड्यात सामना खेळला गेला. ईडन गार्डनवरही अशा प्रकारचा हा पहिलाच सामना होता. या मैदानावर अंतिम लढतीत भारताने विंडीजचा पराभव केला होता. आता २५ वर्षांनंतर उभय संघांदरम्यान रविवारी टी-२० क्रिकेटची लढत रंगणार आहे.ईडन गार्डन टी-२० सामन्याचे यजमानपद भूषविण्यासाठी सज्ज आहे. भारताने कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर विंडीज संघानेवन-डे सामन्यांच्या मालिकेत थोडी चांगली कामगिरी केली. त्यांनीएक लढत टाय केली तर एकसामना जिंकला. अखेरच्या दोन सामन्यांत मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या दोन सामन्यात भारताने वर्चस्व गाजवले. टाय लढत आणि त्यानंतरचा पराभव यामुळे भारतीय संघाला इशारा देण्यास पुरेसा ठरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान मिळाले. आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा विचार करता रोहितला पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करण्याची संधी आहे.विराट कोहलीसाठी ही मालिका स्वप्नवत ठरली असून तो हाच फॉर्म आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कायम राखण्यास उत्सुक असेल. निवड समितीने त्याला आॅस्ट्रेलिया दौºयासाठी फ्रेश ठेवण्यासाठी टी-२० मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.कसोटी व वन-डे क्रिकेटच्या तुलनेत विंडीजचा टी-२० संघ चांगला आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टीचांगली आहे. आंद्रे रसेल, किरोन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमेयर आणि शाई होप यांच्यासारखेफलंदाज भारतापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहेत. याचमैदानावर त्यांच्या कर्णधाराने टी-२० विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत चार षटकार ठोकले होते. टी-२० क्रिकेटमध्ये विंडीज संघ बलाढ्यआहे, याची भारतीय संघालाचांगली कल्पना आहे. या मालिकेच्या निमित्ताने युवा रिषभ पंतला चांगली संधी आहे. धोनीला पर्याय शोधणे सोपे नाही. पंत ही जागा भरुन काढण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. (गेमप्लॅन)

टॅग्स :India vs West Indiesभारत विरुद्ध वेस्ट इंडिज