शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 21:01 IST

शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या गोलंदाजाला बसवलं बाकावर

Asia Cup 2025, No Arshdeep Singh In Team India Playing 11 First Match Against UAE : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यूएई विरुद्धच्या लढतीसह टी-२० आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यासाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंगला संधी मिळालेली नाही. अर्शदीप सिंग हा भारतीय टी-२० संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.  छोट्या फॉरमॅटमध्ये भारताकडून त्याने सर्वाधिक ९९ विकेट्स घेतल्या आहेत. शंभरीचा डाव साधून तो मोठा विक्रम आपल्या नावे करेल, अशी चर्चा रंगली असताना त्याला बाकावर बसवण्यात आले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अर्शदीप सिंगला बसवलं बाकावर

अर्शदीप सिंग याने आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत ६३ टी२० आंतरारष्ट्रीय सामन्यात ९९ विकेट्स घेतल्या आहेत. एका विकेटसह तो क्रिकेटच्या छोट्या प्रकारात शंभर विकेटचा डाव साधणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरणार आहे. पण पहिल्या सामन्यात त्याला बाकावर बसवण्यात आल्यामुळे मोठा डाव साधण्याची त्याची प्रतिक्षा लांबली आहे. 

Asia Cup Record : रोहित-अझरुद्दीन यांनी दुहेरी डाव साधला; पण MS धोनीच्या नावे आहे खास रेकॉर्ड

एक प्रमुख जलदगती गोलंदाज, तीन फिरकीपटूंसह ऑलराउंडवर भर

भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी जसप्रीत बुमराहच्या रुपात एका प्रमुख जलदगती गोलंदाजांसह तीन फिरकीपटूंना खेळवण्याला पहिली पसंती दिलीये. याशिवाय मध्यम जलदगती गोलंदाजाच्या  रुपात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेला खेळवण्याचा निर्णय घेतलाय. परिणामी या प्लॅनमुळे टी-२० तील भारताच्या गोलंदाजीतील सिंग इज किंगवर बाकावर बसण्याची वेळ आली आहे. यूएई विरुद्धचा हा प्लॅन ठिकये, पण पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यावेळी मात्र हा डाव खेळताना टीम इंडियाला शंभर वेळा विचार करावा लागेल. १४ सप्टेंबरला तरी अर्शदीपला शंभरीचा डाव साधण्याची संधी मिळणार का? ते आता पाहण्याजोगे असेल.भारताची प्लेइंग इलेव्हन 

अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उप-कर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेट किपर बॅटर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती. 

टॅग्स :Asia Cup 2025आशिया कप २०२५asia cupएशिया कपArshdeep Singhअर्शदीप सिंगIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती