शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया बुल्सच्या गैरव्यवहाराचा तपास आता सीआयडीकडे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 09:47 IST

परदेशात निधी वर्ग केल्याचा संशय; ३०० कोटींहून अधिकची रक्कम 

- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बांधकामासह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या इंडिया बुल्स समूहाविरुद्धच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. बनावट कंपन्यांची स्थापना व शेअर्सच्या दरात चढ-उतार करून इंडिया बुल्स हौसिंग काॅर्पोरेशनकडून ३०० कोटींहून अधिकचा गैरव्यवहार करून ही रक्कम देश-विदेशात विविध खात्यांवर वर्ग करण्यात आली. त्यामुळे सविस्तर तपासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी इंडिया बुल्सचे संचालक हरीश फॅबियानी, मुकेश तलरेजा यांच्यासह बुडीत येस बँकेचे प्रमोटर राणा कपूर, त्यांची कन्या बिंदूसह ८ जणांविरुद्ध पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आशुतोष कांबळे यांनी गेल्या १३ एप्रिलला त्याबाबत फिर्याद दिली होती. १ एप्रिल २०१९ ते जून २०२० या कालावधीत गैरव्यवहार केल्याचे त्याने नमूद केले आहे.

इंडिया बुल्स समूहाच्या इंडिया बुल्स हौसिंग आणि इंडिया बुल्स व्हेंचर्स या दोन कंपन्यांकडून ८० टक्के काम चालविले जात आहे. इतर कंपन्यांना कर्ज पुरवठा करून त्यांना इंडिया बुल्सचे शेअर्स खरेदी करायला लावले जात होते. त्यातून कंपनीने मोठा नफा कमावला. त्यानंतर संचालकांनी ही रक्कम आपल्या अन्य कंपन्यांमध्ये वर्ग केली आणि इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स तोट्यात असल्याचे दाखवून त्याच्या शेअर्सचे भाव पाडण्यात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची तक्रार आशुतोष कांबळे याने वाडा पोलिसांकडे केली होती.

स्थानिक पोलिसांच्या तपासाला ३० जूनपर्यंत स्थगितीवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याला इंडिया बुल्सच्या वतीने न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अल्पावधीत सर्व यंत्रणेकडे तक्रार करण्यात आली आणि पूर्वनियोजन करून चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यात म्हटले होते.

गुन्ह्याची व्याप्ती देशासह परदेशात!या गुन्ह्याची व्याप्ती देशभरात, तसेच परदेशात असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले. येस बँकेकडून इंडिया बुल्सने मोठे कर्ज मिळविल्यानंतर राणा कपूर यांची कन्या बिंदू कपूर हिच्या कंपनीला बेकायदेशीररीत्या कर्ज दिले हाेते. अशा प्रकारे ३०० कोटींहून अधिकचा गैरव्यवहार केला असून, त्याचा तपास रिझर्व्ह बँक व सेबीकडून स्वतंत्रपणे केला जाईल. त्यामुळे हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव पालघर अधीक्षकांकडून करण्यात आला. महासंचालक संजय पांडे यांनी त्याला तातडीने मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :fraudधोकेबाजी