शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"चिल्ला मत, नहीं तो मार डालुंगा", शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ!

By प्रशांत माने | Updated: September 25, 2022 19:12 IST

शनिवारी दिवसभरात लुटमारीच्या पाच घटना कल्याण शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण: शनिवारी दिवसभरात लुटमारीच्या पाच घटना कल्याण शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळयातील सोन्याचे ऐवज आणि पादचा-यांकडील मोबाईल लंपास केल्याने रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनांप्रकरणी महात्मा फुले चौक, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असलेतरी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

पश्चिमेकडील रामदासवाडीतील शालीनी वैद्य या सकाळी ८ वाजता साईबाबा मंदिर समोरील रोडवरून जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी वैद्य यांच्या गळ्यातील ७५ हजाराची सोन्याची माळ खेचली. यावेळी वैद्य यांच्या मानेला फास लागून त्यांना घासले गेले. त्यांनी आरडाओरडा करताच त्यांना 'चिल्ला मत नही तो मार डालूंगा' अशी धमकी देत चोरटे ऐवजासह पसार झाले. 

दुसरी घटना भोईरवाडी बसस्टॉपजवळ सकाळी ७ ला घडली. खुशाल चव्हाण हा धावण्याचा सराव करून सुभाषचौक मार्गे बिर्ला कॉलेज बाजुच्या रोडने जात असताना दोघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी भिडू तेरा मोबाईल दे दे असे ते खुशालला बोलले.  खिशातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता खुशालने विरोध केला. दरम्यान, आणखीन त्याठिकाणी दोघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी मोबाईल काढून घेत चौघेही पसार झाले. तिस-या घटनेत विकास गोस्वामी सकाळी सहा वाजता एपीएमसी मार्केटच्या गेटसमोरील रोडवरून पायी जात असताना त्यांच्याकडील मोबाईल देखील मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरटयांनी लांबवित पत्रीपूलाच्या दिशेने धूम ठोकली. 

चौथी घटना वसंत व्हॅली याठिकाणी घडली. रचना खटवानी या येथील पपई विक्रेत्याकडे खरेदी करण्यासाठी जात असताना त्यांच्या गळयातील ५० हजार रूपये किमतीची सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली तर पाचव्या घटनेत स्नेहल सावंत यांच्या गळ्यातील २५ हजार रूपये किमतीची सोन्याची माळ मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी धुमस्टाईने चोरून नेली. ही घटना बिर्ला कॉलेजरोडवर रात्री पावणेनऊच्या दरम्यान घडली. या पाचही घटना शनिवारी एका दिवसात घडल्याने पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी