शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रिपब्लिक चॅनेलच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By पूनम अपराज | Updated: October 23, 2020 19:14 IST

Criminal Offence registered on Editorial staff of Republic News Channel : मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे पवार हे कार्यरत असताना बिगेस्ट न्यूज टुनाईट या मथळ्याखाली रिपब्लिक टीव्हीने 22 ऑक्टोबरला एक वृत्त प्रसारित केले होते. त्यात इतर तपास अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली होती.

मुंबई -  मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून रिपब्लिक टीव्हीचे वार्ताहर, अँकर आणि चॅनेलच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अँकर आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक शिवानी गुप्ता, उपसंपादक सागरिका मित्र, उपसंपादक शावन सेन, कार्यकारी संपादक नारायणस्वामी आणि संपादकीय कर्मचारी, तसेच न्यूजरुम प्रभारी, संबंधित न्यूज प्रसारित करण्यासाठी संपादकीय कर्मचारी आणि न्यूजरूम प्रभारी व इतर यांच्याविरोधात पोलीस (अप्रितिची भावना चेतवणे) अधिनियम 1922 कलम 3(1) व भादंवि कलम 500(बदनामी करणे) व 34 (सामायिक कृत्य) अंतर्गत गुन्हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे कार्यरत असताना बिगेस्ट न्यूज टुनाईट या मथळ्याखाली रिपब्लिक टीव्हीने 22 ऑक्टोबरला एक वृत्त प्रसारित केले होते. त्यात इतर तपास अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली होती. या वृत्तामुळे मुंबई पोलिस दलाची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलीस आयुक्तांची बदनामी करण्यात आल्यावरून पवार यांनी याप्रकरणी तक्रार केली.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईRepublic TVरिपब्लिक टीव्हीParam Bir Singhपरम बीर सिंग