शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या आड आली म्हणून पोटच्या पोरीनं आईचा काटा काढला; सत्य ऐकून पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 22:34 IST

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला

आग्रा -  उत्तर प्रदेशातील आग्रा येथील व्यापारी अंजली बजाज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. घटनेनंतर महिलेची मुलगी फरार आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या मुलीचा प्रियकर प्रखर गुप्ता याने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली असून, मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट कसा रचला हे त्याने सांगितले आहे.

हत्येनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला असता प्रखर आणि अंजलीच्या अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार अंजली आणि त्यांच्या पतीलाही कळला. याच कारणावरून पालकांनी मुलीला प्रखरला भेटण्यास मनाई केली होती. अशा स्थितीत मुलीने प्रियकरासह मिळून आईला तिच्या मार्गावरून दूर करण्याचा भयंकर प्लॅन केला.

'मुलीने आई-वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले'प्लॅनिंगचा एक भाग म्हणून प्रखरने गंजदुंडवारा येथील आपल्या ओळखीच्या सहकाऱ्याला पैशाचे आमिष दाखवून कटाचा भाग बनवला. यानंतर ८ जून रोजी प्रखर, त्याचा मित्र शिलू आणि अंजलीच्या मुलीने प्लॅनिंगनुसार आई आणि वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. जिथे संधी मिळताच प्रखर आणि शीलूने मुलीच्या आईचा खून केला. यानंतर मृतदेह जागीच टाकून ते पळून गेले.

त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यासोबतच प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच आरोपीच्या सांगण्यावरून या घटनेतील एक चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक दुचाकीही जप्त केली आहे.

'आई मला घ्यायला वनखंडी महादेव मंदिरात ये'बुधवारी अंजलीची मुलगी शास्त्रीपुरमहून बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. बराच वेळ घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. काही वेळाने मुलीचा निरोप आला की आई मला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात ये. दरम्यान मुलीने वडिलांना फोनवर दुसऱ्या ठिकाणी बोलावले. यावर ते पत्नीला मंदिरात सोडून तिथे गेले. त्यानंतर मुलीने वडिलांना फोन करून घरी पोहोचल्याची माहिती दिली. यानंतर पती उदित पत्नीला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात पोहोचला मात्र ती तेथे आढळली नाही.

मुलीच्या कटात इकडे तिकडे पळत उदित घरी परतला. तेथे पत्नी न सापडल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी शोध सुरू केला आणि रात्री उशिरा काकरैथा येथील ग्रामस्थांनी पोलिसांना महिलेचा मृतदेह जंगलात पडल्याची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले आणि मृतदेह अंजलीचा असल्याचे समजले.