शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पती करायचा गर्भपात, पत्नीला लोक म्हणायचे वांझ; वाद होताच पाटा घालून महिलेला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:15 IST

पती करायचा गर्भपात, पत्नीला लोक म्हणायचे वांझ; वाद विकोपाला गेला; पाटा घालून महिलेला संपवलं

शाहजहापूर: उत्तर प्रदेशातील शाहजहापूरात धक्कादायक घटना घडली आहे. पती पत्नीमधील वाद टोकाला गेल्यानंतर पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. डोक्यात पाटा घालून पतीनं पत्नीला संपवलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मूल नसल्यानं लोक आमच्या लेकीला वांझ म्हणत टोमणे मारायचे. तर दुसरीकडे तिचा पती वारंवार तिला गर्भपात करायला लावायचा, असा आरोप महिलेच्या कुटुंबानं केला आहे. 

सेरामऊ दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चौहनापूर गावात वास्तव्यास असलेल्या हरिकांत त्रिपाठीनं त्याची पत्नी पिंकी त्रिपाठीची हत्या केली. स्वयंपाकघरात वाटणासाठी वापरल्या जाणाऱ्या पाट्यानं हल्ला करून हरिकांतनं पिंकीला संपवलं. वांझ असल्याचे टोमणे पिंकीला लोकांकडून ऐकावे लागायचे. तिचा पती वारंवार तिला गर्भपात करायसा लावायचा. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे. त्या वादातूनच हरिकांतनं पिंकीची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

घटनेची माहिती मिळताच आम्ही हरिकांतच्या घरी पोहोचलो. तिथे पिंकीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याचं पोलीस अधीक्षक एस. आनंद यांनी सांगितलं. पिंकीच्या भावानं हरिकांतविरोधात तक्रार नोंदवली. हरिकांतला पहिल्या पत्नीपासून दोन मुलगे असून पिंकी त्याची दुसरी पत्नी होती, अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली.