रशियाने युक्रेनवर हल्ला केला, युक्रेन या संकटाचा सामना करत आहे. यानंतर देशांतर्गत लूटमारीच्या घटनाही समोर येऊ लागल्या. सततच्या हल्ल्यामुळे युक्रेनला मोठा फटका बसला असून या संधीचा फायदा समाजकंटक घेताना दिसत आहेत. दरम्यान, अशाच एका समाजकंटकास खांबाला बांधून शिक्षा करण्यात आली. युक्रेनच्या लोकांनी लुटारूंना पकडले. यानंतर त्याची पँटही काढण्यात आली.डेलीमेलच्या वृत्तानुसार, कीवमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर एक माणूस लुटमार करत होता. त्यानंतर या व्यक्तीला एएमआयसी पेट्रोल स्टेशनवर खांबाला बांधण्यात आले. त्याचवेळी त्याची पँट गुडघ्यापर्यंत खाली उतरवली होती. समोर आलेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती या कथित लुटारूवर ओरडताना दिसत आहे. या फोटोत बाजूला पोलिसांची गाडीही दिसत आहे.
युक्रेनमध्ये एका व्यक्तीला पॅन्ट काढून बांधले खांबाला, लुटमारीची दिली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 13:24 IST