शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती असल्यानेच तिने केली आत्महत्या; बलात्कार करून आत्महत्येस केले प्रवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 07:52 IST

सचिनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली.

ठाणे - अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आणाभाका घेत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून गर्भवती राहील्यामुळे तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार शवविच्छेदनाच्या अहवालामुळे तसेच मोबाइलमधील संभाषणातून उघड झाल्यानंतर यातील आरोपी सचिन जयस्वार (२०) याला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

मनोरमानगर येथे एका चाळीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला. ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालयात या मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. यापूर्वीही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने त्याला चितळसर पोलिसांनी अटक केली होती. त्या प्रकरणात तो जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा तिला लग्नाचे प्रलाेभन दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सचिनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली.  त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला. 

वरिष्ठ निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  निरीक्षक ज्योत्स्ना पाटील यांच्या पथकाने तिचा मोबाइल तपासला.  मेसेज व कॉल संभाषणाच्या तपशिलातून सचिन या शाळकरी मित्राचे नाव समोर आले.