शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत झाला जोरदार राडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 06:19 IST

भीतीने विद्यार्थी बसले लपून : कुलगुरू कार्यालयावर एका गटाकडून दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी (जि. अहमदनगर) : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात रविवारी अधिकृत व अनधिकृत विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. अनधिकृत गटाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी अधिकृत विद्यार्थ्यांचा गट थेट कुलगुरू कार्यालयात लपून बसला. हे समजताच अनधिकृत गटाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. सुरक्षारक्षक व विद्यापीठ प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांच्यातील वाद मिटविला.

  कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यापीठात देशभरातून   विद्यार्थ्यांची ऑनलाईन निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांना ७० हजार रुपये शुल्क भरावे लागते. विद्यापीठात एकूण १६८ प्रवेश मर्यादा आहे. प्रवेशित विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात. या विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये शेकडो विद्यार्थी अनधिकृतरीत्या राहत आहेत. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी वसतिगृहापासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर दगडफेक केली. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केला. 

विद्यार्थ्यांनी घेतले स्वत:ला कोंडूनदरम्यान, रविवारी अधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांनी स्वत:ला काेंडून घेत आंदाेलनाची भूमिका घेतली. कुलगुरूंनी स्वत: लक्ष घालावे, अशी त्यांची मागणी हाेती; पण कुलगुरू तब्येतीच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना भेटणार नाहीत हे निश्चित असल्याने सायंकाळी विद्यार्थी वसतिगृहामध्ये गेले.दरम्यान,या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती प्रहार जनशक्तीचे आप्पासाहेब ढूस यांनी दिली.

अनधिकृत विद्यार्थ्यांचा आकडा ५०० वरराहुरी कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये विविध स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अनधिकृतपणे अनेक विद्यार्थी राहत आहेत. अशा अनधिकृतपणे राहत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५०० पेक्षा अधिक असल्याचे अधिकृत विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

 काही परीक्षांच्या काळात बाहेरचे विद्यार्थी येथे येतात.  विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत वाद हाेते. आता ते वाद मिटविले आहेत.- महानंद माने, कुलमंत्री, राहुरी कृषी विद्यापीठ