शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत उत्तरप्रदेशचे चोरटे, पूर्ण टोळीच गजाआड

By योगेश पांडे | Updated: November 26, 2023 22:06 IST

उत्तर प्रदेशातील ही टोळी रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या कटरच्या साहाय्याने हाय टेंशन लाइन, केबल्स इत्यादी कापून त्यांच्या मालवाहू वाहनांतून घेऊन जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर. नवीन कामठी ठाण्यांतर्गत गस्तीदरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी उत्तरप्रदेशातील असून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून शस्त्रास्त्रासह १५ लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही टोळी कुठेतरी मोठा दरोडा टाकण्याचा तयारीत होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

इरशाद अली नौशाद अली (३०), बद्रुद्दीन इदरीस चौधरी (३४), विनोद राजमन गौतम (३२), मोहम्मद शरीफ नुसरत अली (३१) आणि फरियाद अशरफ अली चौधरी (२७), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत. युनिट-पाचच्या पथकाला शनिवारी रात्री साडेअकरा वाजता गादा गावाजवळील हनुमान मंदिराजवळ काही संशयित लोक गुन्ह्याची योजना आखत असल्याची खबर मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ चाकू, दोरी, मिरची पावडर, ५ मोबाईल, ३ कटर, स्क्रू ड्रायव्हर, एक कार आणि एक कार्गो व्हॅन असा १५ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, विक्रांत थारकर, आशिषसिंग ठाकूर, प्रमोद वाघ, महादेव थोटे, गौतम रंगारी, रामचंद्र कारेमोरे, रोनाल्डो अँथनी, सुशील गवई, आशिष पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हाय टेंशन लाइन आणि केबल्स होते ‘टार्गेट’सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ही टोळी रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या कटरच्या साहाय्याने हाय टेंशन लाइन, केबल्स इत्यादी कापून त्यांच्या मालवाहू वाहनांतून घेऊन जाते. एका शहरात चोरी केल्यानंतर ही टोळी रात्रीच दुसऱ्या शहरात पळून जाते. या टोळीतील आरोपींवर नवी मुंबई आणि पुणे येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी