शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उंदिरमामानं मार्ग दाखवला अन् मुंबई पोलिसांना १० तोळे सोनं सापडलं; काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:16 IST

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तपासाला सुरुवात केली.

मुंबई - शहरातील दिंडोशी परिसरात नाल्यातून तब्बल १० तोळं सोनं पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सोनं मिळवण्यासाठी पोलिसांना चक्क एका उंदिरमामांनी मदत केली आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे. एका उंदराच्या सहाय्याने पोलिसांनी महिलेला हरवलेले सोनं परत मिळवून दिले आहे. महिलेने भिकारी स्त्रीला कोरडा पाव पिशवीतून दिला. ती स्त्रीने कचराकुंडीत फेकली होती. याच पिशवीत सोन्याचे दागिने होते. ज्याची किंमत ५ लाखांच्या आसपास होती. 

मुंबई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने सोन्याची पिशवी महिलेला ताब्यात दिली आहे. पावाच्या नादात पिशवी फेकली मात्र पोलिसांनी वेळीच यंत्रणा कामाला लावली त्यामुळे महिलेला हरवलेले सोन्याचे दागिने मिळाले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. 

नेमकं काय घडलं?दिंडोशी पोलीस स्टेशन हद्दीतील सुंदरी नावाच्या महिलेला मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडायचं होतं. त्यासाठी घरातील १० तोळे दागिने गहाण ठेवण्यासाठी ती बॅकेत जात होती. परंतु सुंदरी घरकामाला ज्याठिकाणी जातात तेथील मालकाने तिला सुका पाव खायला दिला. तो पाव तिने नकळत सोन्याच्या पिशवीत ठेवला. त्यानंतर बॅँकेत जाण्यासाठी पुढे निघाली. मात्र वाटेत पावाची पिशवी तिने एका भिकारी महिलेला आणि तिच्या मुलाला दिली आणि बँकेत पोहचली. परंतु त्याठिकाणी सोन्याची पिशवी तिने महिलेला दिल्याचं लक्षात आलं. तीने तातडीने पुन्हा महिला भेटलेल्या ठिकाणी गेली. परंतु भिकारी स्त्री नव्हती. म्हणून सुंदरीने दिंडोशी पोलीस स्टेशनला धाव घेतली. 

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तपासाला सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा भिकारी स्त्री तिथून निघून जाताना दिसली. पोलिसांनी महिलेला शोधलं असता तिने पाव कोरडा असल्याने पिशवीसह तो कचऱ्यात टाकल्याचं सांगितले. पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोध घेतला परंतु पिशवी सापडली नाही. त्यानंतर पोलिसांनी कचराकुंडीजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा उंदिर त्या पिशवीत घुसल्याचं दिसलं. तसेच पिशवीत ठेवलेला पाव खात इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी या उंदराचा पाठलाग केला. तोपर्यंत उंदिर पिशवी घेऊन नाल्यात शिरला. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने उंदराच्या ताब्यातील पिशवी त्यांच्याकडे घेतली. त्याच पिशवीत सुंदरीचे सोन्याचे दागिने एका पाकिटात असल्याचं दिसून आले.  

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस