शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या गेटवरील मैत्री विद्यार्थिनीला पडली महागात; सोन्याचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 08:50 IST

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी, मुंबई सेंट्रल परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू घरातील १२ वर्षीय मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे.

मनीषा म्हात्रे

मुंबई : वडाळ्यातील पालिका शाळेत विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच, शाळेच्या गेटवरील मैत्रीमुळे विद्यार्थिनीला स्वतःचा खिसा रिकामा करत घरात चोरी करण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना नागपाड्यात घडली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. 

मुंबई सेंट्रल परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू घरातील १२ वर्षीय मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे. भायखळा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती शिकते. २०१९ मध्ये शाळेच्या गेटवर भेटणाऱ्या अमन नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. ओळखीतून अमनने तिला एका रूममध्ये नेत  नग्न केले. त्याचे व्हिडीओ काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुढे, रूममध्येच कोंडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तीन लाख रुपये उकळले. 

पाठलाग... अन् बेल्टने मारहाणकुलाबा परिसरात राहणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी परीक्षा देऊन शाळेच्या गेटमधून बाहेर पडत असताना आर्मी मार्केटकडून एकाने पाठलाग करत तिचा हात पकडून अश्लील चाळे केले. तसेच, तिच्या मदतीसाठी धावलेल्या मित्रमैत्रिणींना बेल्टने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी केंद्रीय महाविद्यालयाबाहेर घडली. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी गणेश अंजिनिया राव (२०) याला अटक केली आहे.  

स्वत:च्याच घरात चोरीत्यानंतर, वेळोवेळी पैसे, दागिन्यांची मागणी करत धमकावले. भीतीने तिने आणखीन दोन लाख, गळ्यातील डायमंड सेट, कमरफूल, डायमंडच्या बांगड्या, सोन्याचे बिस्कीटचे लॉकेट, एक डायमंड रिंग, एक सोन्याची चेन, एक सोन्याचा नेकलेस चोरी करून त्याला दिला. घरातील पैसे, दागिने गायब होत असल्याने कुटुंबीयांना संशय आला. तसेच, मुलीच्याही वागण्यात बदल जाणवल्याने आईने मुलीला विश्वासात घेत चौकशी केली. तेव्हा, तिने अमनच्या अत्याचाराला वाचा फोडली. आईने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अपहरण, खंडणी, पोक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत ते अधिक तपास करत आहेत. 

मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.  याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. - महेशकुमार ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलिस ठाणे