शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वाचवा साहेब! बायको काठीनं हाणते!! जिल्हाधिकारी कार्यालयात नवरा धाय मोकलून रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 11:49 IST

बायको जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप

पन्ना: मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी दरम्यान लोक आपल्या तक्रारी घेऊन येतात. जिल्हाधिकारी कार्यालयात एक व्यक्ती आपली गाऱ्हाणं घेऊन पोहोचली. या कार्यालयात एक पती त्याच्या पत्नीची तक्रार घेऊन पोहोचला.

पत्नीवर वैतागलेल्या पतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला. पत्नी शिवीगाळ करत काठीनं मारहाण करत असल्याची व्यथा त्यानं मांडली. त्यानं घटनेचा व्हिडीओदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला. पन्ना शहरातील इंद्रपुरी वसाहतीत हा घटना घडला. 

राम रतन सिंगरौलचं लग्न १३ वर्षांपूर्वी मिनूशी झालं. त्यांना एक ११ वर्षांची मुलगी आहे. पत्नीमुळे त्रासलो असून जेव्हा जेव्हा घरी जातो, तेव्हा पत्नी काठीनं मारते, अशी व्यथा राम रतननं मांडली. माझी पत्नी मला जीवे मारण्याच्या प्रयत्नात आहे. ती मला मानसिक त्रास देते. मी घरात नसताना काही लोकांची माझ्या घरी ये-जा असते, असंही राम रतन म्हणाला.