शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात अन् युद्धात कोणतेही नियम नसतात- कोर्ट; बलात्काराच्या आरोपातून युवक दोषमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 13:56 IST

२०१४ मध्ये एका पुरुषावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या फिर्यादीला त्याच पुरुषाकडून दुसरे मूल झाले

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, चेन्नई: २०१४ मध्ये एका पुरुषावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या फिर्यादीला त्याच पुरुषाकडून दुसरे मूल झाले. मध्यस्थी प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बलात्कारात शिक्षा झालेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले, “प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात.”

आरोपी आणि २१ वर्षीय महिला दूरचे नातेवाईक असून, ते शेजारी राहत होते. महिलेचे वडील वारले होते आणि ती तिच्या आजीसोबत राहत होती. २० मे २०१२ रोजी आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला. तिच्यावर जबरदस्ती केली आणि धमकी देऊन बलात्कार केला. २०१४ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. यानंतर तिने आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. २०१७ मध्ये जिल्हा महिला सत्र न्यायालय, कुड्डालोरने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. याला त्याने हायकोर्टात आव्हान दिले.

नेमके काय झाले?

  • हायकोर्टाला महिलेच्या पोटी जन्मलेल्या मुलाच्या कल्याणाची चिंता वाटली. 
  • या चिंतेचे निराकरण करण्यासाठी, मुलाच्या भवितव्याबाबत तोडगा काढण्याच्या आशेने हे प्रकरण मध्यस्थीकडे हायकोर्टाने पाठवले. 
  • मध्यस्थीत तोडगा निघाला नाही. बलात्काराच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करताना, हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, “तक्रार, गुन्हा, खटला किंवा शिक्षा यापैकी काहीही आरोपी व फिर्यादीला वेगळे करू शकले नाही.”

महिला घटनेच्या वेळी प्रौढ; तिला माहीत होते

  • महिला घटनेच्या वेळी प्रौढ होती. तिला माहीत होते किंवा किमान माहीत असले पाहिजे की ती कशात गुंतली आहे.
  • तिने मूल होईपर्यंत कोणताही आरोप लावला नव्हता. त्यांनी अनेक वेळा शरीरसंबंध मान्य केले. ट्रायल कोर्टाने मात्र याकडे दुर्लक्ष केले.

तरुण मुला मुलींनी त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा मार्ग निवडल्यास, देशाची घटना नैतिकतेचे विधान करत नाही.हे प्रकरण कदाचित ‘प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात’ या विधानाची साक्ष आहे.- न्यायमूर्ती एन. शेषशायी

टॅग्स :Courtन्यायालयLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टHigh Courtउच्च न्यायालय