शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सालगड्याच्या मेहुणीवर शेतातच अत्याचार; पीडित तरुणी सहा महिन्यांची गर्भवती

By राजकुमार जोंधळे | Updated: June 2, 2025 23:26 IST

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, अल्पवयीन मुलगी ही सहा महिन्याची गर्भवती राहिल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

राजकुमार जाेंधळे 

औसा (जि.लातूर) : शेतातील सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. यामध्ये मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. मागील सात ते आठ महिन्यांपासून आराेपी हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत हाेता, शिवाय याबाबत काेणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत हाेता. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, आराेपी हा पसार झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी बहिणीकडे राहण्यासाठी आली होती. दरम्यान, मेहुणा आराेपीच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत होता. आरोपी हा सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर नजर ठेवत वारंवार शेतातील शेडकडे येत हाेता. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला आपण नवरा-बायकोप्रमाणे राहू असे सांगत, सतत जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत बहिणीला, मेहुण्याला काही सांगितलंस, तर जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सहा महिन्यांनंतर उघड झाली.

याबाबत पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, अल्पवयीन मुलगी ही सहा महिन्याची गर्भवती राहिल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या प्रकरणी औसा पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आराेपीविराेधात ॲट्रॉसिटी, अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नाेंदविला. तिने घडल्या प्रकाराचे कथन पाेलिसांसमाेर केले आहे. तपास औशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी हे करीत आहेत.