शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांनी युवकाने घेतला आईच्या हत्येचा बदला; मारेकऱ्याला घरात घुसून ठार मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 08:29 IST

रोहतक जिल्ह्यातील घिरोठी गावांत शुक्रवारच्या मध्यरात्री ६५ वर्षीय सुरजीत नावाच्या व्यक्तीची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या करण्यात आली.

रोहतक - हरियाणाच्या रोहतक इथं मुलाने आईच्या हत्येचा बदला घेत गुन्हेगाराला ठार केले आहे. २० वर्षापूर्वी या युवकाच्या आईची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी मुलाचे वय अडीच वर्ष होते. या महिलेची ३ जणांनी मिळून केली होती. त्यातील २ जणांचा आधीच मृत्यू झाला होता तर तिसरा व्यक्ती ज्याचे वय ६५ वर्ष होते ज्याची या युवकाने हत्या केली आहे. 

रोहतक जिल्ह्यातील घिरोठी गावांत शुक्रवारच्या मध्यरात्री ६५ वर्षीय सुरजीत नावाच्या व्यक्तीची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या करण्यात आली. पोलीस तपासात अधिकाऱ्यांनी घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एक युवक रात्रीच्यावेळी मृत व्यक्तीच्या घराच्या दिशेने जाताना दिसत होता. सुरजीतच्या कुटुंबानेही सुनीलला पाहिलं होते. त्यानंतर पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा हिसका दाखवताच सुनीलने हत्येचा गुन्हा कबूल केला. त्याचसोबत सुनीलने सुरजीतच्या हत्येचे कारणही पोलिसांना सांगितले. 

आईच्या हत्येचा घेतला बदलापोलीस जबाबात सुनील म्हणाला की, २० वर्षापूर्वी माझ्या आईची ३ जणांनी मिळून हत्या केली होती. त्यात सुरजीतचा समावेश होता. गावातील अनेकजण तुझ्या आईचे मारेकरी जिवंत आहेत आणि तू काहीच करू शकत नाही असं उकसवत होते. हत्येत सहभागी असलेल्या दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. केवळ सुरजीत जिवंत होता. रोज रोज भेटणाऱ्या लोकांकडून टोमणे ऐकून मी वैतागलो त्यातून सुरजीतच्या हत्येचा प्लॅन आखला. सुरजीत म्हशीच्या तबेल्यात झोपला होता. तेव्हा लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या केली असं आरोपी युवकाने तपासात उघड केले. 

या प्रकरणी पोलीस अधिकारी रणवीर सिंह म्हणाले की, वृद्धाच्या हत्येआरोपात आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासात त्याने आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वृद्धाला मारल्याचं कबूल केले. आरोपी सुनीलला कोर्टासमोर हजर केल्यानंतर रिमांडवर घेण्यात आले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला रॉड पोलिसांनी जप्त केला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.