शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! आई-मुलानेच केली बापाची हत्या; मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवायचे, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:15 IST

दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या महिलेसह २ आरोपींना अटक केली.

नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हिचं हत्याकांड ताजे असतानाच दिल्लीत आणखी एक असाच भयानक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीच्या पांडव नगर परिसरात क्राईम ब्रांचनं पतीच्या हत्येच्या आरोपात एका महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे. हे दोघंही मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यानंतर दरदिवशी लपूनछपून तुकडे बाहेर फेकले जायचे. अनैतिक संबंधातून पतीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पूनम आणि तिचा मुलगा दीपक या दोघांनी मिळून ही हत्या केली. आरोपी महिलेने तिचा पती अंजन दास यांना नशेच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत मुलगा दीपकच्या मदतीने अंजन दासची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधावरून अंजन दासला संपवण्याचा कट रचण्यात आला होता. क्रूरता म्हणजे आरोपी पूनम आणि दीपक दोघेही घरातच अंजनच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये लपवत होते असं समोर आले आहे. 

मृत अंजनच्या शरीराचे तुकडे एक एक करून पांडव नगर परिसरात फेकले गेले. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या महिलेसह २ आरोपींना अटक केली. त्याचसोबत ज्या फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवले जायचे तोदेखील जप्त केला. सध्या पोलीस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहेत. या घटनेने आसपासचे नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत. पोलीस आरोपी पूनम आणि दीपकची कसून चौकशी करत आहेत. 

श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचेही तुकडेकाही दिवसांपूर्वी मुंबईच्या श्रद्धा वालकर हिच्या हत्येचं रहस्य समोर आले. आफताबसोबत ती दिल्लीच्या महरौली भागात लिव्ह इनमध्ये राहत होती. आफताबनं १८ मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. श्रद्धासोबत वाद झाल्यानं आफताबनं हे क्रूर कृत्य केले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते घरातील फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवले होते. हे तुकडे रोज तो बाहेर नेत होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकत होता. 

या प्रकरणाचा खुलासा होताच पोलिसांनी आफताबला १२ नोव्हेंबरला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप कुठलाही मोठा पुरावा त्यांच्या हाती लागला नाही. मात्र या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. आफताबला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे आणि जवळपास ३ महिने तो फ्लॅटमध्ये राहत होता. इतके भयानक कृत्य करूनही आफताबला कुठलाही पश्चाताप नसल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणानंतर आता दिल्लीतील पांडव नगर भागातील या घटनेने पोलिसांसमोर नवं आव्हान उभं केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर