शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नात्यातीलच महिलेशी अनैतिक संबंध, पत्नीने पतीच्या डोक्यात मुसळी मारून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 16:11 IST

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नी व मुलाला ताब्यात घेण्यात आली आहे.

- संजय शहाणे

नाशिक/ इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील यशवंतनगर परिसरातील एका आपार्टमेंट मधील सदिनिकेत पत्नीने पतीचे नात्यातीलच दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयतातून मुलाच्या मदतीने पतीच्या डोक्यात मुसळी मारून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नी व मुलाला ताब्यात घेण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाजी गवळी ( 41, समृद्धी प्लाझा, यशवंतनगर दामोदर चौक, पाथर्डी फाटा) हे त्यांची पत्नी सुनीता एक मुलगा (23) एक मुलगी(20) राहतात. गवळी‌ अंबड येथील कंपनीत कामाला होते. त्यांचे नात्यातीलच महिलेची अनैतिक संबंध असल्याचे त्यांची पत्नी सुनीता हिला कळाले होते. त्यामुळे सुमारे आठ महिन्यापूर्वीच पिंपळनेर पोलिस ठाण्यात त्यांचा वाद गेला होता. त्यावेळी पुन्हा असे घडरणार नाही असे अश्वासन देत या संदर्भात गवळी यांनी समझोता केला होता. परंतु पुन्हा गवळी यांनी बाहेरील महिलेश अनैतिक संबंध सुरूच ठेवल्याचा प्रकार त्यांची पत्नी सुनीता गवळी यांना कळाली. तसेच गवळी घरात पैसे देत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. 

या वादातून रविवारी रात्री पती-पत्नीमध्ये झालेले भांडण टोकाला गेले आणि संशयित पत्नी सुनीता गवळी यांनी त्याचा राग धरून सोमवारी (दि.10) पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास दादाजी गवळी झोपेत असताना मुलगा विशाल याच्या मदतीने दादाजी यांच्या डोक्यात मुसळीने मारून त्यांचा खून केला. या घटनेची माहिती पोलिसांना सकाळी सात वाजेच्या सुमारासा मिळाली, त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर सिंह राजपूत, उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह सह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित सुनीता गवळी व मुलगा विशाल गवळी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी