शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

"मी प्रेग्नेंट आहे..." ऐकताच युवकाला बसला धक्का; मृत्यूपूर्वी गर्लफ्रेंडला पाठवला सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:37 IST

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

रिवा - मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात आत्महत्येचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे समजताच युवकाने हा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी युवकाने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत संवाद साधला होता. त्यावेळी गर्लफ्रेंडनं मी प्रेग्नेंट आहे असं सांगताच युवकाला मोठा धक्का बसला. त्यानंतर युवकानं गर्लफ्रेंडला सेल्फी पाठवून गळफास घेत आत्महत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

रिवा जिल्ह्यातील संजय नगर भागातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय विनय कुमार द्विवेदी संजय नगर भागात भाड्याने घर घेऊन राहत होता. सोमवारी रात्री उशिरा विनयनं त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी जेव्हा विनय खोलीतून बाहेर आला नाही. तेव्हा घरमालकाला संशय आला. त्याने याबाबत तातडीने पोलिसांना फोन करून कळवलं. 

दरवाजा तोडून पोलीस घरात शिरलेया घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. विनयचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर त्याचा मोबाईल बेडवर पडला होता. तपासावेळी विनयने जीव देण्यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडशी संवाद साधल्याचं उघड झाले. त्याचसोबत सुसाईड करतानाचा फोटोही तिला पाठवला होता. 

विनयची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट होती. जेव्हा ही गोष्ट विनयला समजली तेव्हा त्याला शॉक बसला. या धक्क्यातून सावरता न आल्याने विनयनं हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या पोलिसांनी विनयचा फोन जप्त केला असून त्याचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी विनयच्या नातेवाईकांनाही कळवले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी सांगितल्यानुसार, विनय हा विद्युत विभागात सब स्टेशनला मेंटेनसचं काम करायचा. घटनेपूर्वी त्याचे कुटुंबासोबत बोलणं झाले होते. परंतु त्याला कुठलाही त्रास आहे असं त्याच्या बोलण्यातून वाटलं नाही असं नातेवाईकानी पोलिसांना सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"