शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रसाधनेच्या नावाखाली ८ हत्या करणाऱ्या 'पाखंडी' बाबाला बेड्या; ट्रिपल मर्डर प्रकरणाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:16 IST

कमरुद्दीन नावाच्या एका पाखंडी बाबाने तंत्रसाधनेच्या नावाखाली आतापर्यंत तब्बल ८ लोकांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

राजधानी दिल्लीतील पीरागढी परिसरात एका कारमध्ये तीन मृतदेह सापडल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या 'ट्रिपल मर्डर' प्रकरणाचा तपास करत असताना दिल्ली पोलिसांनी एका अशा नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत, ज्याच्या कृत्यांनी पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. कमरुद्दीन नावाच्या एका पाखंडी बाबाने तंत्रसाधनेच्या नावाखाली आतापर्यंत तब्बल ८ लोकांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

गेल्या ८ फेब्रुवारी रोजी पीरागढी परिसरात एका टाटा टिगोर कारमध्ये तीन जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले होते. तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यामध्ये मृत व्यक्ती लोनी परिसरात याच पांढऱ्या कारमधून येताना दिसल्या. दुसऱ्या फुटेजमध्ये ते गाडी पार्क करून कमरुद्दीनच्या घराच्या दिशेने चालत जाताना दिसले. या फुटेजमुळेच कमरुद्दीन पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मुलींची 'निवड' करण्याची विचित्र पद्धत

पोलिसांनी कमरुद्दीनच्या अड्ड्यावर धाड टाकली असता तिथे धक्कादायक पुरावे सापडले. हा पाखंडी बाबा तंत्रसाधनेच्या नावाखाली मुलींना बोलावयचा. विशेष म्हणजे, त्याला विशिष्ट उंची, वजन आणि वर्णाचीच मुलगी हवी असायची. पोलिसांना त्याच्याकडे अशा अनेक मुलींचे फोटो सापडले आहेत, ज्यांच्या हातात एक कागद असून त्यावर त्यांचे नाव, वजन आणि उंची लिहिलेली आहे. या खुनातील मृत लक्ष्मी नावाच्या महिलेच्या फोनमध्येही असेच फोटो सापडल्याने कमरुद्दीनचा कट उघड झाला आहे.

रिमांडमध्ये रोज नवे खुलासे

दिल्ली पोलिसांनी कमरुद्दीनला ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत घेतले आहे. चौकशीदरम्यान त्याने मान्य केले की, त्याने केवळ या तिघांचीच नाही, तर आतापर्यंत ८ जणांचा बळी घेतला आहे. त्याच्या अड्ड्यावरून तंत्रसाधनेची पुस्तके आणि काही संशयास्पद साहित्यही जप्त करण्यात आले आहे. हा बाबा नेमका कोणत्या हेतूने या हत्या करत होता? यामागे मानवी बळी देण्याचा काही प्रकार होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

भोंदूगिरीचा बळी?

लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या या बाबाच्या कृत्यामुळे लोनी आणि पीरागढी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीत अनेक लोकांच्या नावांचा उल्लेख केला असून, पोलीस आता त्या बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असून, यामागे आणखी काही लोकांचा हात आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली