शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या अतिस्वच्छतेला वैतागला, तिची हत्या करून स्वत:ही गळफास घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 14:35 IST

पत्नीची अतिस्वच्छता ही दोघांच्या मरणास आणि मुलांना पोरकं करण्यास कारणीभूत ठरली आहे. 

ठळक मुद्देआत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सत्यमूर्ती (४०) असे असून त्याच्या पत्नीचे नाव पुट्टमणी (३८) असे होते. अनेक जाती, धर्माच्या लोकांकडून त्या आपल्याकडे येत असल्याने त्या नोटा धुवून घेत असं त्यांच्या शेजाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली. 

म्हैसूर - कर्नाटकात एका कुटुंबात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या अतिस्वच्छतेला कंटाळून ४० वर्षीय पतीने ३८ वर्षीय पत्नीची हत्या करून स्वतःला गळफास लावून घेतला. त्यानंतर शाळेतून घरी परतलेल्या मुलांनी गळफास घेतलेले वडिलांचे हृदयद्रावक चित्र पाहिले आणि मृत वडिलांबाबत शेजाऱ्यांना कळविण्याचा खेदजनक प्रसंग त्यांच्यावर ओढावला. मात्र, पत्नीची अतिस्वच्छता ही दोघांच्या मरणास आणि मुलांना पोरकं करण्यास कारणीभूत ठरली आहे. 

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सत्यमूर्ती (४०) असे असून त्याच्या पत्नीचे नाव पुट्टमणी (३८) असे होते. १५ वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. पुट्टमणी यांना अती स्वच्छतेची सवय असल्याने त्या दिवसभरात अनेकदा आपल्या मुलांना अंघोळ घालत असत. तुम्ही कधी नोटा धुवून वाळत घालणारी व्यक्ती पहिली नसेल मात्र, आश्चर्य म्हणजे घरी आणलेल्या नोटाही धुवून वाळत घालायच्या. अनेक जाती, धर्माच्या लोकांकडून त्या आपल्याकडे येत असल्याने त्या नोटा धुवून घेत असं त्यांच्या शेजाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली. 

आम्ही तिच्या घरात गेल्यास ती आधी अंघोळ करुन या असं सांगेल म्हणून आम्ही त्यांच्या घरी जायलाही घाबरत असून,” असं दुसऱ्या शेजाऱ्याने बोलताना सांगितलं. सत्यमूर्ती आणि पुट्टमणी यांना ७ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, मुले शौचालयास गेली, गुरांना चारायला घेऊन गेली अथवा कोणी स्पर्श केला तरी ती त्यांना अंघोळ करण्यास सांगत असे, शेजाऱ्यांनी पुढे सांगितले.

मंगळवारी याच कारणावरुन पती पत्नीत वाद झाला. शेतामध्ये काम करतानाच दोघांमध्ये वाद झाला असता संतापाच्या भरात सत्यमुर्तीने पुट्टमणीची कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केली. त्यानंतर सत्यमूर्ती घरी आला आणि त्याने गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी मुले शाळेतून घरी आली तेव्हा त्यांना सत्यमूर्ती घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळून आला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सत्यमूर्ती यांना खाली उतरवलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याKarnatakकर्नाटक