शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मेव्हुणीवर जीव जडला, पतीनं पत्नीचा काटा काढला; आरोपीनं हत्येनंतर मृतदेहावर बलात्कार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:37 IST

रामबीर पैसे घेऊन महिलेकडे पोहचला त्याठिकाणी पतीने पैसे दिल्याचं सांगितले तेव्हा महिलेने दरवाजा उघडला

नोएडा – रागाच्या भरात माणूस काय पाऊल उचलतो याचं त्यालाही भान राहत नाही. नोएडामध्ये झालेल्या एका हत्याकांडानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. २२ वर्षीय महिलेची हत्या केली पण आरोपीनं तिच्या मृतदेहासोबत सेक्स केल्याचं उघड झालं. आरोपीनं महिलेच्या पतीकडून दीड लाखांची सुपारी घेतली होती. हा आरोपी २८ वर्षीय ऑटो चालक असून पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रामबीर उर्फ साहू हा मृत महिलेच्या पतीचा मित्र होता. मित्राने पत्नीची हत्या करण्यासाठी त्याला दीड लाखाची सुपारी दिली. जेव्हा काम झाले तेव्हा पतीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तक्रारीत म्हटलंय की, मृत महिलेच्या पतीनं २० जानेवारीला संध्याकाळी तक्रार नोंदवली की तो घरी परतला तेव्हा त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.

नोएडा एडीसीपी रणविजय सिंहनं सांगितले की, रामबीर सेक्टर ९४ गोल चक्करजवळ अटक केली. १९ जानेवारीला त्याच्या मित्राने पत्नीच्या हत्येसाठी ७० हजार रुपये देणार असल्याचं सांगितले. आगाऊ रक्कम त्याने दारु पिण्यात खर्च केली. २० जानेवारीला महिलेचा पती त्याला महामाया फ्लायओव्हरवर भेटला आणि पत्नीची हत्या करण्याचा आग्रह केला. परंतु रामबीरनं नकार दिला. तेव्हा त्याने ७० हजारांची ऑफर वाढवून दीड लाखांपर्यंत केली. रामबीरला पैशाचं आमीष दाखवून त्याने पत्नीची हत्या केली.

रामबीर पैसे घेऊन महिलेकडे पोहचला त्याठिकाणी पतीने पैसे दिल्याचं सांगितले तेव्हा महिलेने दरवाजा उघडला. तेव्हा रामबीरनं बळजबरीनं घरात घुसत तिच्या डोक्यावर वार केला. महिला बेशुध्द झाली. तेव्हा आरोपीने तिचं डोकं जमिनीवर जोरजोरात आपटून तिचा जीव घेतला. इतकचं नाही तर रामबीरनं मृत महिलेसोबत सेक्स केला. मृतदेहाच्या पोस्टमोर्टममधून ही बाब समोर येताच रामबीरनं गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याच्यावर हत्येसोबत बलात्काराचाही गुन्हा नोंद केला आहे.

पतीलाही बेड्या ठोकल्या

पोलिसांनी सांगितले की, रामबीरच्या जबाबावरुन मृत महिलेच्या पतीलाही अटक केली. जो महामाया फ्लायओव्हरजवळ दुकान चालवत होता. महिलेच्या पतीचा मेव्हुणीवर जीव अडकला होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. म्हणून पत्नीचा काटा काढण्याचा प्लॅन त्याने रचला.