शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याला आतेभावाच्या मदतीने संपविले; औरंगाबाद गुन्हेशाखेने २४ तासात केला उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:15 IST

दारूच्या नशेत सतत मारहाण करणाऱ्या नवऱ्याचा आतेभावाच्या मदतीने पत्नीने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

ठळक मुद्देरेणुकामाता मंदीर कमानीजवळ २३ जुलै रोजी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.

औरंगाबाद : दारूच्या नशेत सतत मारहाण करणाऱ्या नवऱ्याचा आतेभावाच्या मदतीने पत्नीने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या खून प्रकरणी गुन्हेशाखेने गळा चिरणाऱ्या आरोपीसह मृताच्या पत्नीला अटक केली. 

धर्मा प्रताप जाधव(रा. राजूर, ता.भोकरदन,जि.जालना, ह.मु.पुंडलिकनगर) आणि ज्योती चव्हाण अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संतोष जानू चव्हाण(२५,मूळ रा.धोपटेश्वर, ह.मु. सातारा परिसर)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले की, बीड बायपास रस्त्यावरील रेणुकामाता मंदीर कमानीजवळ २३ जुलै रोजी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत आढळला होता.

घटनेनंतर पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक राहुल सुर्यतळ आणि कर्मचाऱ्यांनी मृताचा चेहरा स्वच्छ करून त्याचे छायाचित्रे काढून ते सातारा परिसरातील विविध लोकांना दाखविले. त्यावेळी मृत हा संतोष चव्हाण असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक संतोषच्या घरी गेले. मृताची पत्नी आणि अन्य नातेवाईकांची त्यांनी विचारपुस केली. त्यावेळी बोलताना मृताची पत्नी ज्योती हीने ती मोबाईल वापरत नसल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. मात्र ती खोटी बोलत असल्याचा संशय पोलिसांना आल्याने तिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ज्योतीने पती संतोष हा दारूच्या नशेत सतत त्रास देत होता.या त्रासाची माहिती तिने तिचा आतेभाऊ धर्मा जाधव याला दिली. महिनाभरापूर्वी धर्मा आणि तिने संतोषला संपविण्याचा कट रचल्याचे सांगितले.