शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवरुन पतीनं बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 15:27 IST

संपूर्ण परिसरात घटनेची चर्चा; पोलीस तक्रार दाखल

 पतीनं व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून बोलावलेली महिला त्याचीच पत्नी निघाल्याची घटना उत्तराखंडमधल्या काशीपूरमध्ये घडली आहे. पती आणि पत्नी समोरासमोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून या घटनेची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधित महिलेचं वर्षभरापूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर तिचं पतीसोबत भांडण झालं. त्यामुळे पत्नी काशीपूरच्या आयटीआय परिसरात असलेल्या तिच्या माहेरी निघून गेली. माहेरी राहायला गेल्यानं पत्नी फार कमी वेळा सासरी यायची. माहेरी निघून गेलेली पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करत असल्याची माहिती तिच्याच एका मैत्रिणीनं पतीला दिली. मैत्रिणीचं संबंधित महिलेशी भांडण झालं होतं. यानंतर शामपुरम परिसरात राहणाऱ्या पतीला मैत्रिणीनं एका महिलेचा नंबर दिला. संबंधित महिला कॉलगर्ल पुरवते, याची माहितीदेखील मैत्रिणीनं पतीला दिली. यानंतर पतीनं कॉलगर्ल पुरवणाऱ्या महिलेशी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. मला एक कॉलगर्ल हवी आहे, अशी मागणी पतीनं केली. त्यानंतर त्या महिलेनं काही महिलांचे फोटो त्याला पाठवले. यातून एकीची निवड कर, असा मेसेज महिलेनं केला. पाठवण्यात आलेल्या फोटोंमधून पतीनं पत्नीची निवड केली आणि संबंधित महिलेला पत्ता पाठवला. पती आणि पत्नी समोर येताच दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. पतीचे आपल्या मैत्रिणीशी संबंध असल्याचा आरोप पत्नीनं केला. तर पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करत असल्याचं पतीनं पोलिसांना सांगितलं. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.