शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : हृदयद्रावक! आईसह ४ वर्षाच्या मुलीची केली गळा चिरून हत्या

By पूनम अपराज | Updated: January 31, 2019 19:48 IST

शाहू नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

मुंबई - धारावी परिसरातील शाहू नगर येथे आज हृदयद्रावक घटना घडली आहे. डायमंड अपार्टमेंट ३४ वर्षीय आईसह ४ वर्षाच्या चिमुकलीचे गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच त्यांचे मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. घरातून धूर आल्याने शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

धारावीतील डायमंड बिल्डिंगमध्ये रियाज हुसेन सय्यद, त्याची पत्नी तेहसिन, मुलगी आलिया उर्फ फातिमा हे तिघे राहत होते. आज सकाळी ३४ वर्षीय तेहसिनची आणि ४ वर्षांच्या फातिमाची गळा चिरुन हत्या केली. यानंतर त्याने दोघांचे मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, घरातून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलीस य हत्येमागील सूत्रधार नक्की कोण याचा तपास करत आहेत. तसेच या हत्येमागील नेमका हेतू देखील पोलीस शोधत आहेत. परिसरात मात्र या हत्येमागे तेहसिनचा पती रियाज असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शाहू नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस