शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आफताबने श्रद्धा वालकरचा खून केला कसा? ३,००० पानांचे आरोपपत्र तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 06:30 IST

आफताब पूनावाला याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. 

नवी दिल्ली :

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून करून इलेक्ट्रिक करवतीने तिचे तुकडे करणाऱ्या आणि फ्रिजमध्ये ते ठेवून थंड डोक्याने त्याची विल्हेवाट लावणाऱ्या आफताब पूनावाला याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. 

आरोपपत्रात १०० हून अधिक जणांचे जबाब आहेत. त्यातील ५५ जण यातील वेगवेगळ्या घटनांचे साक्षीदार  आहेत. अनेक महिन्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोळा केलेले महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुरावेही यात आहेत. हे आरोपपत्र जानेवारीअखेर दाखल करण्यात येणार आहे.आरोपपत्रात आफताबचा कबुलीजबाब, त्याची नार्को टेस्ट आणि फॉरेन्सिक टेस्टचा अहवाल दिला आहे. पोलिसांनी छतरपूरच्या जंगलातून जप्त केलेल्या हाडांचा आणि त्यांच्या डीएनए अहवालाचाही उल्लेख आहे, ज्यावरून ही हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट होते. ४ जानेवारीला दक्षिण दिल्लीतील मेहरौली जंगलात सापडलेले केस आणि हाडांचे नमुनेही श्रद्धाशी जुळतात.आफताब दोन महिन्यांपासून कोठडीतआफताबने १८ मे २०२२ रोजी लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने ३०० लीटरचा फ्रीज आणला असता. पोलिसांनी आफताबला पकडले आणि मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाची हाडे जप्त केली. २८ वर्षीय आफताब पूनावाला गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे. आपण श्रद्धाला क्षणिक रागाच्या भरात संपवले होते, असा दावा आफताबने कबुली जबाबात केला आहे.

पोलिस म्हणतात...३००० पानांचे आरोपपत्र५५ संबंधितांचे जबाबश्रद्धाच्या हत्येनंतरही जवळपास दहा दिवस आफताब तिचा फोन, क्रेडिट कार्ड, सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता.आफताबसोबतच श्रद्धाला शेवटचे पाहिले गेले.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर