शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: हॉरिबल! मुलगा बहीणीला कॉपी पुरवत होता; दुसऱ्या विद्यार्थीनीला लव्हलेटर वाटले; तिच्या भावांनी तुकडे तुकडे केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:04 IST

सध्या सहामाही परीक्षा सुरु आहेत. वर्गात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनीला खिडकीतून कॉपी देण्यासाठी तिचा भाऊ आला होता.

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सहामाही परीक्षा देत असलेल्या आपल्य़ा बहीणीला कॉपी पुरविण्यासाठी गेलेल्या १२ वर्षांच्या मुलाच्या शरीराचे रेल्वे ट्रॅकवर तुकडे तुकडे सापडले आहेत. एका छोट्याशा गैरसमजामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

सध्या सहामाही परीक्षा सुरु आहेत. वर्गात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनीला खिडकीतून कॉपी देण्यासाठी तिचा भाऊ आला होता. त्याने कॉपीचा कागद तिच्या दिशेने आत फेकला. परंतू, तो तिच्याकडे न पडता दुसऱ्याच विद्यार्थिनीकडे जाऊन पडला. या मुलीला ते लव्हलेटर असल्याचे वाटले, याची तक्रार तिने घरच्यांकडे केली. तिच्या घरच्यांनी मुलाला पकडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि रेल्वे ट्रॅकवर नेऊन टाकले. 

सोमवारी पोलिसांनी त्याचे शरीर गोळा केले. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. उदवंतनगर पोलीस ठाणे परिसरातील हा प्रकार आहे. दया कुमार असे या मुलाचे नाव आहे. तो १३ ऑक्टोबरला मोठ्या बहीणीच्या शाळेत गेला होता. मुलगी सहावीत शिकत होती, तर तो पाचवीत परंतू दुसऱ्या शाळेत शिकत होता. 

दुसऱ्या मुलीने तिच्या भावांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानी त्याला पकडून मारहाण केली व अपहरण केले. चार दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी एकूण ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ४ जण हे अल्पवयीन आहेत. उरलेल्या पाच जणांना पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.  

टॅग्स :Biharबिहार