शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरात बनविले विषारी वायूचे गॅस चेंबर; आईसह मुलींची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 05:40 IST

नैराश्येने ग्रासलेल्या दोन मुलींनी फ्लॅटच्या खोलीत विषारी वायूचे चेंबर बनवून आईसह स्वत:ला कोंडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नैराश्येने ग्रासलेल्या दोन मुलींनी फ्लॅटच्या खोलीत विषारी वायूचे चेंबर बनवून आईसह स्वत:ला कोंडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेने काही सुसाईड नोट लिहून ठेवलेल्या आढळून आल्या आहेत. 

वसंत विहार परिसरारतील वसंत अपार्टमेंटमध्ये ५० वर्षीय मंजू या अंशिका आणि अंकू या ३० वर्षीय मुलींसाेबत राहत हाेत्या. त्यांच्या घरातून काेणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलेने शेजाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पाेलिसांना कळविण्यात आले. पाेलिसांनी खिडकीतून घरात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना विषारी वायूचा गंध आला. त्यानंतर सावधगिरीने घरात शिरल्यावर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. खाेलीत शेगडीमुळे धूर पसरला हाेता. तसेच गॅस शेगडीचा नाॅबही थाेडा उघडल्याचे पाेलिसांना आढळले. त्यांचा मृत्यू श्वास काेंडल्यामुळे झाला की विष प्राशन केल्यामुळे, याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, असे पाेलिसांनी सांगितले.

सुसाईड नाेटमध्ये सावधगिरीच्या सूचना 

घरातून मिळालेल्या सुसाईड नाेटमध्ये सूचना लिहून ठेवल्या हाेत्या. खाेलीमध्ये विषारी कार्बन माेनाॅक्साईड भरलेला आहे. खिडकी उघडावी आणि पंखा सुरू करून खाेलीला हवेशीर बनवावे. माचिस किंवा मेणबत्ती पेटवू नये, असे एका चिठ्ठीत लिहिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्ली