शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

बनावट नोटांची घरातूनच छपाई; मुंबईसह राज्यभरात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 11:00 IST

मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक एक लाख रुपयांच्या बनावट नोटा ३० हजारांत अशा टक्केवारीवर सावज हेरून या नोटा चलनात आणत होता.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्नाटकमधील एका घरातूनच बनावट नोटांची छपाई करून मुंबईतील दुकानात तसेच बाजारात त्या चलनात आणल्या जात असल्याची धक्कादायक माहिती दादर पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी कर्नाटक टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून दादरमधील एका बारमध्ये एकजण बनावट नोटांद्वारे मद्य खरेदी करत   असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक  रामकृष्ण सागडे, पोलीस अंमलदार संतोष पाटणे, अजित महाडिक, महेश कोलते, गणेश  माने, राजेंद्र रावराणे आणि आंधळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगूटराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १४ जुलैला परेल एसटी डेपोसमोरून बनावट नोटा बाळगणारा आनंदकुमार रचना ममदापूर (२९) याला ताब्यात घेतले.  त्याच्या घरी छापा टाकताच ४२  हजारांची बनावट रक्कम पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार, गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. 

आनंदकुमार हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून, त्याने या नोटा हुमनाबाद, कर्नाटक येथील शिवकुमार शंकरकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार, पथक कर्नाटकला रवाना झाले. तेथे सापळा रचून शिवकुमारसह किरण अरुण कांबळे (२८) याला ताब्यात घेतले.  त्यांच्याकडून आणखीन २० हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. या दोघांनी दहिसरच्या आकाश तडोलगी याला देखील  १०० व २०० रुपयांच्या  बनावट नोटा दिल्याचे सांगितले. त्यानुसार, त्यालाही दादर पोलिसांनी २६ जुलै रोजी बेड्या ठोकल्या.

नोटासाठी लागणारे साहित्य जप्तपोलीस चौकशीत किरण कांबळे हा मुख्य सूत्रधार असून, तो कर्नाटकमध्ये राहत्या घरातूनच बनावट नोटांची छपाई करीत होता. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी त्याने बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती समोर आली. त्याच्या घरातून  बनावट नोटा छपाईसाठी वापरण्यात येणारे एक कलर प्रिंटर, पेपर कटर, साधे कटर, स्टीलची पट्टी, शाईच्या बाटल्या, नोट छपाईसाठी लागणारा कागद, हिरव्या रंगाचा टेप असे साहित्य जप्त केले आहे. 

यूट्युबवरून प्रशिक्षण किरण कांबळेने यूट्युबवरून बनावट नोटा बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्या मोबाइलमध्ये सोन्याच्या बिस्किटांसह आणखीन महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

टक्केवारीवर बनावट नोटा बाजारात कांबळे हा एक लाख रुपयांच्या बनावट नोटा ३० हजारांत अशा टक्केवारीवर सावज हेरून या नोटा चलनात आणत होता. तसेच, दारू विक्री केंद्र तसेच गर्दीच्या ठिकाणी १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत होता. आतापर्यंत चारही आरोपींकडून ६८,६०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.