शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

होर्डिंग दुर्घटना प्रकरण : जाहिरात कंपनीच्या मालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 5:59 AM

होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना ते कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कॅप्शन अ‍ॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्घ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना ते कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कॅप्शन अ‍ॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्घ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अब्दुल रज्जाक महंमद खालीद फकिह (वय ५४, रा. अर्जुन मनसुखानी पथ, कोरेगाव रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या जाहिरात कंपनीच्या मालकाचे नाव आहे. कॅप्शनकडून परवान्याची मुदत संपल्याने कोसळलेल्या होर्डिंगसह परिसरातील इतर तीन होर्डिंग काढण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांना १३ डिसेंबर २०१७ रोजी पत्र दिले होते. पण रेल्वेकडून त्यांना परवानगी देण्यात आली नाही. ठेकेदारामार्फत हे होर्डिंग काढले जाईल, असे रेल्वेकडून जाहिरात कंपनीला सांगण्यात आले होते. या प्रकरणात यापूर्वी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय ४२, रा. विकासनगर, देहूरोड) आणि त्याचा सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे (वय ५७, रा. कसबा पेठ) यांन ६ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर ठेकेदार मल्लिकार्जुन व त्याच्या कामगारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी किरण राजाराम जाधव (वय ३६, रा. मुंढवा रोड, घोरपडी गाव) यांनी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत शाम राजाराम धोत्रे (वय ४५, रा. जनता वसाहत, पर्वती), शामराव गंगाधर कसार (वय ७०, रा. पिंपळे गुरव), शिवाजी देविदास परदेशी (वय ४०, रा. २९१, नाना पेठ) आणि जावेद मिसबाउद्दीन खान (वय ४५, रा. स्पाइन रोड, चिखली) यांचा मृत्यू झाला होता. तर १० जण जखमी झाले आहेत.तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगीया प्रकरणी दाखल केलेल्या फियार्दीत लोखंडी होर्डिंगचा साचा कापणारे कामगार व ठेकेदार यांनी स्थानिक प्रशासन व पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच परवानगी न घेता सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही. यामुळे साचा पडून नागरिक मृत व जखमी झाल्याचे म्हटले आहे.संबंधीत गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा व अजामीनपात्र असून सत्र न्यायालयात चालणारा आहे. तसेच अटक आरोपींकडून फरार आरोपींची माहिती व ठावठिकाणा काढावयाचा आहे. गॅस कटर व मशिन जप्त करावयाचे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एम. एम. काळवीट यांनी केली होती. मात्र प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी टी. एम. निराळे यांनी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.कोसळलेले होर्डिंग अनधिकृत असून ते धोकादायक असल्याचे पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने रेल्वे प्रशासनाला २०१३ पासून वेळोवळी पत्र पाठवून कळवले होते. मात्र, रेल्वेकडून त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. होर्डिंग खूपच कमकूवत झाल्यावर रेल्वे प्रशासनाने ते पाडण्याचे काम हाती घेतले होते.होर्डिंग गॅस कटरच्या साह्याने खालच्या बाजूने कापत असताना ते सिग्नलवर थांबलेल्या सहा रिक्षा, एक कार व दोन दुचाकींवर पडले. धक्कादायक बाब म्हणजे होर्डिंग इतरत्र पडू नये म्हणून त्यांना अगदी किरकोळ दोऱ्यांनी बांधण्यात आले होते.या संदर्भात घटनेच्या दिवशी रात्री उशिरा रेल्वे प्रशासन व ठेकेदाराविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विष्णुदेवसिंग आणि वनारे यांना अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Arrestअटक