शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत खून प्रकरणात चौघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 19:29 IST

शेतातील औत अडविल्याच्या कारणावरून तसेच जुन्या शेतीचा वादातून शिवानंद वायकुळे यांचा खून झाल्याची घटना १ जून २०१५ रोजी कळमनुरी तालुक्यातील पोळोदी शेत शिवारात घडली होती.

हिंगोली : शेतातील औत अडविल्याच्या कारणावरून तसेच जुन्या शेतीचा वादातून शिवानंद वायकुळे यांचा खून झाल्याची घटना १ जून २०१५ रोजी कळमनुरी तालुक्यातील पोळोदी शेत शिवारात घडली होती. या प्रकरणात चौघांना अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.  आय. पठाण यांनी ३० जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कळमनुरी तालुक्यातील पोळोदी येथील शेत गट क्रमांक १३६ मध्ये १ जून १०१५ रोजी शिवानंद वायकुळे व त्यांच्या पत्नी तसेच औतवाले हे शेतात जात असताना ११ जणांनी संगनमत करून अडविले. याबाबत शिवानंद यांनी त्यांचे भाऊ (फिर्यादी) गणेश बापूराव वायकुळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर गणेश वायकुळे, साक्षीदार मालतीबाई वायकुळे, सखुबाई वायकुळे यांनी औत का अडविले याबाबत विचारणा केली. यावेळी आरोपींतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून व पूर्वीच्या शेताच्या वादातून धारदार शस्त्राने तसेच काठ्या व कु-हाडीने, दगडाने शिवानंद वायकुळे यांच्या डोक्यात मारहाण केली. यात शिवानंद यांचा मृत्यू झाला. तसेच गणेश वायकुळे व त्यांच्या आईस जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी गणेश वायकुळे यांनी याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी सुभाष शंकरअप्पा सातभाई, गजानन शंकरअप्पा सातभाई, शिवानंद सातभाई, रवि सुभाष सातभाई, रमेश सुभाष सातभाई, शंकरअप्पा सुभानजी सातभाई, मणकर्णाबाई सुभाष सातभाई, हरि संतोष हिंगणकर, पोलीस कर्मचारी सुरेश नारायण संगेकर, प्रतिमा गजानन सातभाई, ज्योती शिवानंद सातभाई यांच्याविरूद्ध कलम ३०२, ३०७, १२०, (ब), १४३, १४७, १४८, १४९ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपासिक अंमलदार पोनि सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोप दाखल केले.

सदर प्रकरण अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.  आय. पठाण यांच्या समोर चालला. सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासले. यापैकी फिर्यादी व साक्षीदार गणेश वायकुळे तसेच मयताची आई सखुबाई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी सुभाष शंकरअप्पा सातभाई, गजानन शंकरअप्पा सातभाई, शिवानंद शंकरअप्पा सातभाई सर्व रा. मोरवाडी तसेच पोलीस कर्मचारी सुरेश नारायण संगेकर आदींना कलम ३०२ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा, तसेच प्रत्येकी २५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

आरोपी प्रा. रवि सुभाष सातभाई यास एक वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा. शंकरअप्पा सुभानजी सातभाई, प्रतिमा गजानन सातभाई यांच्याकडून १ वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेतले व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड ठोठावला. उर्वरित चौघांना निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकरी वकील गजानन व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालयjailतुरुंग