शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

हिंगोलीतील खून प्रकरणातील आरोपीस बडोद्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:01 IST

शेर-ए-पंजाब धाब्यासमोरील उभ्या कंटेनरमध्ये आढळलेल्या मृतदेह प्रकरणी चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यातील आरोपीस बाळापूर पोलिसांनी बडोदा गुजरात येथून अटक केली आहे.

हिंगोली : शेर-ए-पंजाब धाब्यासमोरील उभ्या कंटेनरमध्ये आढळलेल्या मृतदेह प्रकरणी चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यातील आरोपीस बाळापूर पोलिसांनी बडोदा गुजरात येथून अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील जरोडा शिवारातील मुख्य रस्त्याशेजारच्या हॉटेल शेर-ए-पंजाब धाब्यासमोर कंटेनर क्र. जी.जे. १४ डब्ल्यू २८२७ हे उभे होते. या कंटेनरच्या कॅबीनमध्ये एक मृतदेह आढळला होता. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोनि व्यंकटेश केंद्रे पथकासह घटनास्थळी हजर झाले. मयतास शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. बारकाईने तपास केला. मयताचे नाव बलवान हवासिंग (रा. कुबजानगर, पिंचोपा कलानदादरी जि. भिवाजी हरियाना) येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात छातीला गंभीर दुखापतीने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोनि केंद्रे, फौजदार तानाजी चेरले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यावेळी दोन गाडीच्या चालकांची भांडणे व मारामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. गुजरात येथील गाडीमालक रमेशचंद्र भालोटिया यांना संपर्क करून त्यांच्या कंपनीच्या दुसऱ्या कंटेनरची माहिती घेतली. त्या चालकाचे आधारकार्ड, चालक परवाना मागवून घेतला. तो फोटो प्रत्यक्षदर्शींना दाखवून ओळख पटविली.

मयतासोबत मारामारी करणारा तोच चालक आहे, ही खात्री पटल्यानंतर या प्रकरणी चालक बलवान जोधाराम (रा. पिंचोपा कलन,  जिल्हा भिवानी हरियाना) याचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपीचे लोकेशन मिळविले. आरोपी हा गुजरातमधील बडोद्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत येणार असल्याची माहिती केंद्रे यांना मिळाली. त्यांनी तातडीने जमादार संतोष नागरगोजे, गोदमवाड यांना बडोद्याकडे रवाना केले. बडोदा (गुजरात) येथील ट्रान्सपोर्ट कंपनीत आरोपी बलवान जोधाराम येताच त्यास बेड्या ठोकल्या. बाळापूर पोलिसांनी त्यास अटक करून जलदगतीने खुनाचा तपास मार्गी लावला. 

‘फिल्टर’ने पटविली ओळखशेर-ए-पंजाब धाब्याजवळ पंक्चर जोडण्याचे दुकान आहे. येथे काम करणारा विठ्ठल चांदराव भिसे (१४, रा. जरोडा) याचे टोपननाव फिल्टर आहे. ग्रीस भरणारा साहेबराव मस्के व फिल्टरने त्या दोन चालकांची मारामारी प्रत्यक्ष पाहिली. मारामारीत मयत हा कंटेनरच्या केबिनमधून खाली पडला. जोरात आवाज आल्याने हे दोघे मदतीसाठी आले. पण आरोपी चालकाने दम देवून दोघांना हुसकावून लावले. पोलिसांनी आरोपीचा फोटो फिल्टरला दाखवताच त्याने तो लगेच ओळखला. फिल्टर व म्हस्के या दोन प्रत्यक्षदर्शीमुळे खुनाच्या गुन्ह्याचा तपास करणे सोपे गेले

टॅग्स :MurderखूनArrestअटकHingoli policeहिंगोली पोलीस