शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By दीप्ती देशमुख | Updated: November 9, 2022 19:55 IST

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी

Sanjay Raut | लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामिनावरील सुटकेचे आदेश देणाऱ्या विशेष PMLA न्यायालयाच्या आदेशावर त्वरीत स्थगिती देण्याची EDची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने ईडीच्या अपिलावर गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. विशेष पीएमएलए पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची जामिनावर सुटका केली. या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. त्यामुळे विशेष न्यायालयाच्या  आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय आदेश देऊ शकत नाही, असे म्हणत न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला त्वरीत स्थगिती देण्यास नकार दिला.

‘मी विशेष न्यायालयाचा आदेशही वाचला नाही. कशाच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, हे सुद्धा मला माहीत नाही. तसेच कशाच्या आधारावर तुम्ही (ईडी) या आदेशाला आव्हान देत आहात, ते ही माहीत नाही. प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय मी स्थगितीचा आदेश कसा देऊ?’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.

‘केंद्रीय तपास यंत्रणेच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेऊ. सुनावणी घेतल्यानंतर जर जामीन रद्द केला तर आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते,’ असे न्यायालयाने म्हटले. कायद्याच्या कोणत्या तरतुदीअंतर्गत मी जामिनाच्या आदेशावर स्थगिती देऊ शकते? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. गुरुवारपर्यंत विशेष न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती द्यावी, अशी मागणी अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, एका दिवसातच या अर्जावर सुनावणी पूर्ण होईल, याची खात्री नाही.

विशेष न्यायालयाने एक महिना जामीन अर्जावर सुनावणी घेतली आणि मग निकाल दिला. मी आत्ताच त्यावर निर्णय घेऊ, अशी अपेक्षा कशी करू शकता? तुमच्याबरोबर (ईडी) किंवा त्यांच्याबरोबर (संजय राऊत आणि प्रवीण राऊत) कोणताही अन्याय होऊ नये. जेव्हा तुम्ही जामीन रद्द करण्यासाठी येता, तेव्हा न्यायालयाला मर्यादित अधिकार असतात,’ असे न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने म्हटले.

ईडीच्या अर्जावर प्रवीण राऊत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी आक्षेप घेतला. आरोपी जर जामिनावर बाहेर आले तर ते फरार होणार नाहीत. एक आरोपी राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची या समाजातच मुळे रूतलेली आहेत. जामिनावर सुटका करताना  विशेष न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. कोणीही पळून जाणार नाही, असे पौडा यांनी म्हटले. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर १०२ दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय