शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालय : ‘त्या’ युवतींना सुधारगृहात ठेवण्याचा आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 05:11 IST

कुंटणखान्यातून पोलिसांनी सुटका केल्यानंतर नियमानुसार २१ दिवसांत त्यांच्या पुनर्वसनाबाबत आदेश न देता गेले आठ महिने देवनार येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या दोन युवतींची मुक्तता करण्याचा आदेश नुकताच उच्च न्यायालयाने दिला.

मुंबई - कुंटणखान्यातून पोलिसांनी सुटका केल्यानंतर नियमानुसार २१ दिवसांत त्यांच्या पुनर्वसनाबाबत आदेश न देता गेले आठ महिने देवनार येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या दोन युवतींची मुक्तता करण्याचा आदेश नुकताच उच्च न्यायालयाने दिला.२३ मे २0१८ रोजी डी.बी. मार्ग पोलिसांनी ग्रँट रोड येथील दिनेश बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील कुंटणखान्यावर छापा घालून एकूण ११ युवतींची सुटका केली होती. त्यातील एकजण अल्पवयीन होती. त्याबाबत पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. इतर दोन युवतींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. ९ आॅगस्ट रोजी पॉक्सोअंतर्गत खटले चालणाºया विशेष न्यायालयाने त्या युवतींना महिला सुधारगृहात पाठवण्याचा आदेश दिला.या आदेशाविरोधात दोन्ही युवतींना उच्च न्यायालयात धाव घेतली. अ‍ॅड. महेश वासवानी आणि अ‍ॅड. धारिणी नागडा यांनी त्यांच्या वतीने याचिका दाखल केली. कुंटणखान्यावर छापा घालून पोलिसांनी सुटका केल्यानंतर लगेच या युवतींना सुधारगृहात पाठवण्यात आले. तेव्हापासून त्या तेथेच असल्याचे अ‍ॅड. महेश वासवानी यांनी न्यायालयाला सांगितले.बळीत युवतींना २४ मे रोजी पॉक्सोअंतर्गत खटले चालणाºया विशेष सत्र न्यायालयात न्या.एम.ए. बरालिया यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. कायद्यानुसार तेव्हापासून २१ दिवसांत त्या युवतींच्या पुनर्वसनाबाबत आदेश द्यायला हवा होता. मात्र तसे न झाल्याने युवतींची सुधारगृहातील स्थानबद्धता अवैध ठरते, असा युक्तिवाद अ‍ॅड. वासवानी यांनी केला.अ‍ॅड. महेश वासवानी आणि सरकारी वकील अ‍ॅड.वीरा शिंदे यांनी केलेल्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाच्या न्या. मृदुला भाटकर यांनी या दोन्ही युवतींची सुधारगृहातून मुक्तता करण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMumbaiमुंबई