शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

२६२ कोटींचे हेरॉईन ; दोघा तस्करांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 08:46 IST

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेएनपीटी परिसरातून कंटेनरमध्ये लपवलेले २६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : २६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केल्यानंतर याप्रकरणी नुकतीच दोघांना अटक केली आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पंजाबमध्येही झाडाझडती घेतली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून समोर आलेल्या माहितीवरून त्यांचे देशभरात रॅकेट चालत असल्याचे समोर आले आहे. 

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेएनपीटी परिसरातून कंटेनरमध्ये लपवलेले २६२ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले होते. पंजाब पोलिसांच्या माहितीवरून ही कारवाई केली होती. मात्र, कारवाईच्यावेळी केवळ कंटेनर हाती लागला होता. त्यामुळे हे ड्रग्स कोणी मागवले व कुठे पोहोचवले जाणार होते, याचा उलगडा झाला नव्हता. तर या प्रकरणात कंटेनरमधून मार्बल मागविणारे व सहा महिने कंटेनर पडून असतानाही ताबा न घेणारे संशयाच्या घेऱ्यात आले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल चौकशीत दोघांना अटक केली. दिल्ली व गुजरात येथून त्यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. 

गुन्ह्याच्या तपासाबाबत गोपनीयतागुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांकडून ‘विशेष’ गोपनीयता राखली जात आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्याशी संपर्क साधला असता, अधिक तपास सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखा पोलिसांची वेगवेगळी पथके पंजाब व इतर राज्यांत तळ ठोकून असल्याचेही सूत्रांकडून समजते. परंतु, अद्यापपर्यंत सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्ती फरार झाली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ