शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हृदयद्रावक! बुडत्या मित्राला वाचवायला गेला; साठवण तलावात बुडून दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 23:42 IST

सायंकाळी काम आटोपल्यानंतर दोघही साठवण तलावात हातपाय धुवायला गेले. योगेश याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला.

जळगाव : शेतात फवारणी केल्यानंतर हातपाय साठवण तलावात हातपाय धुवायला गेलेल्या योगेश ज्ञानेश्वर वराडे (२०) व ज्ञानेश्वर दगडू ढमाले (२७) दोन्ही रा.विटनेर या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता विटनेर, ता.जळगाव शिवारात घडली. योगेश व ज्ञानेश्वर हे दोघं जिवलग मित्र होते.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दगडू ढमाले याच्या शेतात गुरुवारी फवारणीचे काम सुरु होते. योगेश हा देखील ज्ञानेश्वरसोबत गेला होता. सायंकाळी काम आटोपल्यानंतर दोघही साठवण तलावात हातपाय धुवायला गेले. योगेश याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळ व खोल खड्डा असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर हा देखील बुडाला. दरम्यान, मुलगा पाण्यात बुडत असल्याचे लांब असलेल्या दगडू ढमाले यांना दिसले, त्यांनी आरडाओरड करुन घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी तलावात उडी घेतली, मात्र तोपर्यंत दोघंही मृत झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांनी  म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांना माहिती कळविली. हवालदार शिवदास चौधरील बळीराम सपकाळे, सचिन देशमुख, स्वप्नील पाटील व समाधान पाटील यांनी धाव घेतली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केले.

दोघंही जिवलग मित्रयोगेश व ज्ञानेश्वर हे दोघही जिवलग मित्र होते. कोठेही ते सोबतच असायचे. या जिवलग मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.योगेश हा अविवाहित होता. वडीलांचे निधन झालेले आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ तर ज्ञानेश्वर याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व वडील असा परिवार आहे.