शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

ट्रांसपोर्टर स्टेटससाठी ठेवायचा तो देशी कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 22:24 IST

वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक टिप्पर मालकांकडे देशी कट्टा आहे. गुन्हे शाखेने अशाच एका ट्रान्सपोर्टरला देशी कट्टा व काडतुसासह अटक केली. अतुल बबनराव काटकर (३२) रा. नीळकंठनगर, हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेने पकडले : मोठ्या रॅकेटचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक टिप्पर मालकांकडे देशी कट्टा आहे. गुन्हे शाखेने अशाच एका ट्रान्सपोर्टरला देशी कट्टा व काडतुसासह अटक केली. अतुल बबनराव काटकर (३२) रा. नीळकंठनगर, हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे.गुन्हे शाखेच्या चेन स्नॅचिंग पथकास अतुल कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अतुलला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा व पाच काडतुस सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अतुलने सात महिन्यापूर्वी मध्य प्रदेशातून कट्टा आणल्याचे सांगितले. सूत्रानुसार अतुलचे म्हणणे आहे की, वाळू वाहतुकीचे काम अतिशय जोखमीचे आहे. अनेक ट्रान्सपोर्टर कट्टा ठेवतात. हे त्यांच्यासाठी स्टेटसचे काम करते. यामुळे त्यानेही स्टेटस म्हणून कट्टा आपल्याकडे ठेवला. गुन्हा करण्याचा कुठलाही उद्देश नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.सूत्रानुसार वाळू वाहतुकीशी संबंधित लोकांकडे कट्टा ठेवणे ही सामान्य बाब आहे. या व्यवसायात अनेक गुन्हेगार आहेत. त्यांचा एकमेकांशी व्यावसायिक वाद सुरु असतो. शस्त्र जवळ असल्यास प्रतिस्पर्धी घाबरून असतात. असे सांगितले जाते की, खापरखेडा किंवा मध्य प्रदेशातून कट्टे आणले जातात. त्यांना रेतीच्या टिप्परमध्ये लपवून आणले जाते. काही ट्रान्सपोर्टर तर कट्ट्याची तस्करीही करतात. हे एक मोठे रॅकेट असू शकते. याची सखोल चौकशी झाल्यास खरा प्रकार उघडकीस येऊ शकतो. पोलिसांनी अतुलला न्यायालयात सादर करून कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून त्याला जामीन दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक