शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Hathras Gangrape : सावधान! बलात्कार पीडितेचा बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By पूनम अपराज | Updated: September 29, 2020 21:36 IST

Hathras Gangrape : उसाच्या शेतात हसत हसत मुलीचा फोटो अनेक लोक शेअर करत आहेत. असा दावा केला जात आहे की, ही मुलगी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित आहे.

ठळक मुद्देइंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रूममध्ये (एएफडब्ल्यूए) असे आढळले की, ज्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या नावावर शेअर केला जात आहे, तो खरतर दुसऱ्या मुलीचा फोटो आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील पीडित मुलीचा आज सकाळी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. 14 सप्टेंबर रोजी या 19 वर्षीय मुलीवर शेतात चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेला न्याय देण्यासाठी अनेक हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. दरम्यान, उसाच्या शेतात हसत हसत मुलीचा फोटो अनेक लोक शेअर करत आहेत. असा दावा केला जात आहे की, ही मुलगी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित आहे.इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रूममध्ये (एएफडब्ल्यूए) असे आढळले की, ज्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या नावावर शेअर केला जात आहे, तो खरतर दुसऱ्या मुलीचा फोटो आहे. हा दावा ट्विटरवर खूप व्हायरल झाला आहे. सामूहिक बलात्कार पीडित नावाच्या हॅशटॅगसह हा फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिले की, "या निरागस, सुंदर  मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला या विचाराने माझे हृदय कंपित झाले. गँगरेप झाला, जीभ कापली गेली, मान आणि पाठीचा कणा तोडला गेला ... इतका अत्याचार कोणालाही सहन करावा लागत नाही! तथापि, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. बदल येणं आवश्यक आहे. आता ही बातमी लिहिली गेल्यानंतर जवळपास १९०० लोकांनी ही पोस्ट शेअर केली होती. पोस्टचा फोटो आपण खाली पाहू शकता.

तसेच, दुसर्‍या युझर अनु तोमरनेही व्हायरल फोटो शेअर करत लिहिले आहे की, “निर्भयाप्रमाणे उत्तरप्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्याची जीभ कापली गेली, पाठीचा कणा आणि मानेला दुखापत केली. " ही पोस्ट  लिहिली गेल्यानंतर जवळपास १८०० लोकांनी ही पोस्ट शेअर केली होती.'जनभारत टाईम्स', 'तेलगू सर्कल्स', 'भारतहेडलाईन्स' आणि 'पब्लिकलिस्ट रेकॉर्डर' सारख्या बर्‍याच वेबसाइट्सनेही हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे फोटो म्हणून आपल्या बातमीत व्हायरल प्रतिमेचा उपयोग केला आहे. या वेबसाइटमध्ये प्रकाशित केलेल्या बातमीत वापरलेला फोटो आपण खाली पाहू शकता.

दाव्याची उलटतपासणी हाथरस येथे राहणा-या सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाला व्हायरल चित्र पाठविले. हा फोटो पाहून पीडितेच्या भावाने सांगितले की, ती त्याची बहीण नाही. उसाच्या शेतात उभी असलेली व्हायरल फोटोत दिसणारी मुलगी आणखी कोणी आहे याची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांनीही केली.आज तकच्या हाथरसचे संवाददाता राजेश सिंघल यांनी पीडितेच्या मुलाखतीचा व्हिडिओ पाठवला. त्याने मुलीची काही छायाचित्रेही पाठविली, जी घटनेच्या आधी आणि नंतरची आहेत. आम्ही ती छायाचित्रे आणि व्हिडिओंची तुलना व्हायरल फोटोंशी केली आणि आम्हाला आढळले की, व्हिडीओ आणि छायाचित्रात दिसणार्‍या मुली वेगवेगळ्या आहेत. हे फोटो खाली पाहू शकता. मुलीची ओळख पटू येत म्हणून आम्ही चेहरा अस्पष्ट केला असल्याची माहित आज तकने दिली आहे.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारViral Photosव्हायरल फोटोज्Uttar Pradeshउत्तर प्रदेशGang Rapeसामूहिक बलात्कार