शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा पोलीस ठाण्यालगतच पकडली हातभट्टीची दारू; राज्य उत्पादन विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 18:43 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवली विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील यांना मुंब्रा कौसा पोलीस ठाण्याच्या बाजुला एकजण वाहनातून दारू विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी खब-यामार्फत माहिती मिळाली.

डोंबिवली:  डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी रात्री कौसा मुंब्रा भागातील जामा मशिदच्या समोर सापळा लावून एका कारमधून ६४० लीटर सुमारे १ लाख ७८ हजार ६०० रूपये किमतीची गावठी दारू जप्त केली. महत्वाचे म्हणजे ही कारवाई कौसा मुंब्रा पोलिस ठाण्याच्या बाजुलाच करण्यात आली आहे.       ही दारू फुग्यांमधून भरून विक्रीसाठी नेण्यात येत होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवली विभागाचे निरीक्षक किरणसिंग पाटील यांना मुंब्रा कौसा पोलीस ठाण्याच्या बाजुला एकजण वाहनातून दारू विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी खब-यामार्फत माहिती मिळाली. पाटील यांनी त्यांच्यासह पथकातील दुय्यम निरीक्षक मल्हारी एस. होळ, सागर धिंदसे, सहाय्यक दुय्यम निरिक्षक पी. ए. महाजन, अमृता नगरकर, प्रीती पाटील, हनुमंत देवकते, शिवराम जाखीरे आदिंनी संबंधित ठिकाणी सापळा लावला. एक कार जामा मशिदीसमोर येऊन थांबली. पथकाने संशयावरून वाहनचालकाला विचारणा केली असता तो घाबरला. त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याच्या वाहनाला घेरले आणि  त्याला ताब्यात घेतले. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता ६४० लीटर गावठी दारूचे फुगे आतमध्ये आढळुन आले.

विवेक पाटील (वय २८ ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. तो कल्याण-शीळ मार्गावरील पडले गावचा राहणारा आहे. त्याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्याने दारू कुठून आणली ? ती कुठे विक्रीला नेण्यात येणार होती ? याची चौकशी सुरू असल्याची माहीती निरीक्षक किरणसिंग पाटील यांनी दिली.  गेल्या वर्षभरात डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाने उंबार्ली टेकडी, मलंगगड डोंगर, हेदुटणे आदी भागात छापे मारून लाखो रूपयांची गावठी दारू जप्त केली आहे.