शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आकोटात पकडला आठ लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:44 IST

अकोट: अकोट शहर पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला आठ लाखाचा गुटखा व पान मसाला जप्त केला. पोलिसांनी जप्तीत दाखविलेले दोन वाहन व गुटखा असा १५ लाखाचा मुद्देमाल १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.

अकोट:अकोट शहर पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला आठ लाखाचा गुटखा व पान मसाला जप्त केला. पोलिसांनी जप्तीत दाखविलेले दोन वाहन व गुटखा असा १५ लाखाचा मुद्देमाल १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. अकोट शहराच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी गुटखा जप्तीची कारवाई करावी लागली.अकोट शहरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, अकोल्यावरून अकोटकडे येत असलेल्या वाहनामधून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला येत आहे. यावरून त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने एमएच ३० एव्ही ०३७७ क्रमांकाचे टाटा पिकअप वाहन दुपारी आणले, तर एमएच ३० बीडी ०७८५ क्रमांकाचे टाटा वाहनाची रात्री तपासणी केली. या दोन्ही वाहनातून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला सागर, गुलाम, वाह, पानबहार, काली बहार, निली बहार असा अवैध गुटखा आढळून आल्याने रीतसर पंचनामा करून जप्त करण्यात आला असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. अवैध गुटख्याची वाहतूक करणारे वाहनचालक शेख आबीद शेख इमदाद रा. बेईतपुरा अकोला व वाहनाचा चालक फय्याज बेग गुलाम बेग रा. शिवणी अकोला यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ लाखांचा गुटखा व ७ लाखांची वाहने असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके व गुन्हे शोध पथकाने केली आहे. दरम्यान, अकोट शहर पोलिसांनी जप्त केलेला लाखोंचा गुटखा व पान मसाला १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासन अकोला येथील सहायक आयुक्त एल. जी. राठोड व अन्न सुरक्षा अधिकारी जी. डब्ल्यू. गोरे यांच्या ताब्यात दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट