शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Guna Gangrape: 'तुमची मुलगी खोलीत बेशुद्धावस्थेत पडलीय'; बाप शोधत शोधत पोहोचताच सात रेपिस्ट पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 10:26 IST

नागरिकांच्या विरोधानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून तिघांच्या घरी नोटीस पाठवून बेकायदा बांधकाम असेल तर त्यावर तोडकामाची कारवाई करण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे. 

मध्ये प्रदेशच्या गुनामध्ये १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे बलात्कारानंतर अज्ञाताकडून मुलीच्या वडिलांना फोन करून तुमची मुलगी एका गल्लीतील खोलीत बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती फोन करून देण्यात आली. या प्रकारामुळे त्या गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून आजी-माजी आमदारांनी आरोपींवर कारवाईसाठी रस्ता जाम केला होता. 

सात आरोपींपैकी चार जण हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी पोस्कोनुसार विविध गुन्ह्यांखाली पाच आरोपींना अटक केली आहे. मुलीच्या वडिलांसह काही स्थानिकांनी तिला एका सुनसान घराच्या खोलीत बेशुद्धावस्थेत पाहिले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी साडे तीन तास रस्ता जाम करून ठेवला होता. पिडीत मुलीने सामुहिक बलात्काराची तक्रार केली आहे. पोलीस मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत. 

'माझी मुलगी सकाळी 10 वाजता शाळेत गेली होती. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिची आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर अचानक एका व्यक्तीचा फोन आला आणि तुमची मुलगी बिनागंज येथील एका वस्तीच्या खोलीत बेशुद्ध पडल्याचे सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर आरोपी तेथून पळून गेले', असे पिडीतेच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांची ओळख विवेक मीणा आणि मोहित मीणा अशी आहे. नागरिकांच्या विरोधानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून तिघांच्या घरी नोटीस पाठवून बेकायदा बांधकाम असेल तर त्यावर तोडकामाची कारवाई करण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे. 

ग्रामस्थांच्या आंदोलनामध्ये चाचौडाचे आमदार लक्ष्मण सिंह, भाजपाच्या माजी आमदार ममता मीणा देखील होत्या. सिंह म्हणाले की, पिडीतेने सात आरोपींची नावे घेतली आहेत. परंतू पोलिसांनी पाचच जणांना अटक केली आहे. पिडीतेला ड्रग्ज देण्यात आले होते, यामुळे ती खूप वेळ बेशुद्ध होती. शहरातील अनेक महिला व मुलींनी स्थानिक एसडीए कार्यालय गाठून आरोपींच्या मालमत्ता पाडून सार्वजनिक परेड करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री आणइ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश