शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केस विंचरून टक्कल लपवलं, गरोदर असताना मारहाण; गुजरातमधील महिलेचा सासरच्यांवर छळाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 20:06 IST

गुजरातमध्ये महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला,

Gujarat Domestic Violence Case:  गुजरातमध्येघरगुती हिंसाचाराला कंटाळून एका महिलेने तिच्या कुटुंबिविरोधात  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २०१९ मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर परिपूर्ण जोडीदाराच्या रूपात महिलेची पतीसोबत ओळख झाली होती. पण सहा वर्षांनी, अहमदाबादमधील एका ३३ वर्षीय महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध महिला पोलीस ठाण्यामध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.

धक्कादायक बाब म्हणजे महिलेने शारीरिक अत्याचार आणि छळाच्या आरोपांसोबत तक्रारीत फसवणुकीचाही आरोप केला. लग्नाच्या एका महिन्यात, महिलेला कळलं की तिच्या पतीने कुशलतेने केस विंचरून त्याचे टक्कल लपवले होते. हे जोडपे २०१९ मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर भेटले आणि अमेरिकेत जाण्यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लग्न केले होते.

तक्रारीनुसार, पतीला आणि सासरच्यांनी महिलेच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले १४० ग्रॅम सोने पुरेसे नसल्याचे सांगत छळ सुरु केला होता.सुरुवातीचा वैवाहिक आनंद लवकरच नाहीसा झाला. यावरुनच त्यांनी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. एफआयआरमध्ये महिलेने आरोप केला पतीने विमान भाड्याचा खर्च परत करण्याचे आश्वासन दिले होते पण ते कधीही दिले नाही.

लग्नाच्या एका महिन्यानंतर, महिलेला आढळले की तिचा नवरा त्याचे टक्कल केसांवर कंघवा विंचरून लपवत होता. लग्नानंतरही त्याने ही गोष्ट पत्नीपासून लपवून ठेवली होती. २०२० मध्ये ते टेक्सासला गेल्यानंतर त्यांच्या लग्नात आणखी कटुता आली. पती वारंवार रागावत असे. २०२२ मध्ये  आरोपीने गरोदरपणात महिलेला मारहाण केली आणि भांडणात तिला बेडवर ढकलून दिले. २०२३ मध्ये बाळाच्या जन्मानंतर  अन्न, औषधे आणि वैद्यकीय मदत केली नाही असाही आरोप महिलेने केला.

दुसरीकडे, सासरच्या लोकांनीही तक्रारदाराच्या भावाला अमेरिकेत त्यांच्या घरी राहण्यापासून रोखले. तसेच महिलेच्या नवजात बाळाला सांभाळण्यासाठी आलेल्या तिच्या आईचाही अपमान केला. फेब्रुवारी २०२५ मध्ये जेव्हा ती तिच्या बहिणीच्या लग्नासाठी अहमदाबादला आली तेव्हा तणाव वाढला. कुटुंबातील सदस्यांनी वारंवार समेट करण्याचा प्रयत्न करूनही, हा वाद सुटला नाही. त्यामुळे सोमवारी, महिलेने औपचारिक तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या पती आणि सासरच्या लोकांवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीशी संबंधित कलमांसह हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :GujaratगुजरातDomestic Violenceघरगुती हिंसा