शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाद टोकाला गेल्यानं पत्नीचा खून केला; मृतदेह सोबत घेऊन 'तो' स्कूटरवरून १० किलोमीटर फिरला

By कुणाल गवाणकर | Updated: November 2, 2020 16:26 IST

खून करणाऱ्या पतीला पोलिसांकडून अटक; इतर कुटुंबीयांची चौकशी सुरू

राजकोट: पत्नीचा खूप करून तिचा मृतदेह स्कूटरवर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातच्या राजकोटमधील पालिटाना भागात हा धक्कादायक प्रकार घडला. एक व्यक्ती दिवसाउजेडी आपल्या पत्नीचा मृतदेह स्कूटरवरून नेत होती. ही घटना पाहून अनेकांना धक्का बसला. अमित हेमनानी असं या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. काही स्थानिकांनी अमितला मृतदेह स्कूटरवरून नेताना पाहिलं. त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अमितला अटक करण्यात आली.सरकारी नोकरी मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर अमित आणि त्याची पत्नी पत्नी सिंधी कॅम्प वसाहतीत राहतात. त्या दोघांमध्ये रविवारी वाद झाला. तो टोकाला गेल्यावर अमितनं नैनाचा गळा आवळून खून केला. वर्षभरापूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. नैनाचा खून केल्यानंतर अमितनं तिचा मृतदेह स्कटूरच्या फूटरेस्टवर ठेवला. त्यानंतर तो सिंधी कॅम्प वसाहतीमधून निघाला. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्यानं जवळपास १० किलोमीटर अंतर कापलं होतं.भयंकर! टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...मृतदेह स्कूटरवरून नेत असताना अनेकांनी अमितला पाहिलं. त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. त्यानंतर काहींनी अमितचा वाहनांमधून पाठलाग केला आणि त्याला पकडलं. यानंतर पोलिसांनी अमितची चौकशी केली. आपण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. रोहिशाला गावाबाहेर असलेल्या जंगलात नेऊन बायकोच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आपण आखली होती, अशी कबुली त्यानं पोलिसांकडे दिली.अमितनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पालिटाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. एम. चौधरींनी दिली. 'अमितची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. तो सध्या अटकेत आहे. अमित आणि नैनाची कुटुंबीयांची चौकशी सध्या सुरू आहे. हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे,' असं चौधरी म्हणाले.

टॅग्स :Murderखून