शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नाराज पतीचं आत्मघातकी पाऊल; पत्नीला मिठी मारली अन् काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 10:33 IST

या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसही हैराण झाले आहेत.

अहमदाबाद – गुजरातच्या अहमदाबाद येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी नवऱ्याशी भांडण करुन माहेरी गेलेल्या बायकोविरोधात पतीन आत्मघातकी पाऊल उचललं आहे. ज्या पत्नीसोबत आयुष्यभर साथ निभवायचं वचन दिले तिचीच अखेरची गळाभेट घेत जगाचा निरोप घेतला. पती-पत्नीच्या या भांडणाचा शेवट इतका क्रूर होईल असं कुणीही कल्पना केली नसेल.

नवरा-बायकोचं प्रेम संपलं आणि एकाच स्फोटात दोघंही मृत्युमुखी पडले. गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील ही घटना आहे. ४५ वर्षीय व्यक्ती लाला पागी याने हे जीवघेणं पाऊल उचललं. पत्नी शारदापासून त्याला वेगळं राहायचं नव्हतं. पत्नीचा हट्ट आणि अनेक प्रयत्नानंतरही नवऱ्याला पत्नी शारदाची नाराजी दूर करण्यात यश आलं नाही. ४५ दिवसांपूर्वी शारदानं नवऱ्याचं घर सोडलं आणि अहमदाबादपासून १३५ किमी अंतरावर असलेल्या तिच्या वडिलांच्या घरी म्हणजे माहेरी गेली.

शारदाचा भाऊ भवन म्हणाला की, माझ्या बहिणीली तिच्या नवऱ्याने आणि कुटुंबाने मानसिक आणि शारिरीक छळ केला. त्यामुळे ती या छळाला वैतागून माहेरी आली होती. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास शारदाचा पती लाला पागी सासरी पोहचला. त्याठिकाणी त्याने शारदाला बाहेर भेटण्यास बोलावले. शारदा बाहेर गेली असता त्याने तिची गळाभेट घेतली आणि मोठा स्फोट घडला. स्फोटाचा आवाज ऐकून घरातील सगळेच बाहेर आले. तेव्हा शारदा आणि तिच्या नवऱ्याच्या चिंधड्या उडल्या होत्या.

या दोघांनाही हॉस्पिटलला नेण्यात आले. स्थानिक पोलिसांना ही माहिती देण्यात आली. घटनास्थळीच शारदाचा मृत्यू झाला होता तर तिचा पती लाला पागीचाही काही वेळाने मृत्यू झाला. शारदा आणि लाला या जोडप्याला २१ वर्षीय मुलगा आहे. पागीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याला जिलेटिनच्या कांड्या कुठे मिळाल्या त्याचा शोध घेतला जात आहे. पागीने त्याच्या छातीवर जिलेटिनच्या कांड्या बांधल्या आणि शारदाला जवळ बोलावून मिठी मारली अन् क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात