शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

केटामाईन तस्करी प्रकरणात गुजरातच्या केमिस्टला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 20:00 IST

औषध उत्पादक कंपनीचा कर्मचारी : कंपनीतून बाहेर काढले होते केटामाईन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केटामाईन ड्रग्ज तस्करी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने गुजरातमधून एका औषधी कंपनीच्या केमिस्टला अटक केली आहे. मयूर पटेल असे आरोपीचे नाव असून, विज्ञान शाखेची पदवी घेतलेला हा आरोपी वापी येथील एका औषध उत्पादक कंपनीत कामाला असून, याच कंपनीतून त्याने केटामाईन बाहेर काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मालमत्ता गुन्हे कक्षाने ठाण्यातील कापूरबावडी परिसरातून प्रतीक पटेल आणि अक्रम शेख या दोघांना अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेले एक किलो केटामाईन जप्त केले होते. या ड्रग्जची किंमत ५० लाखापेक्षा अधिक असून, दोघेही कारने ठाण्यात आले होते. त्यांनी हे केटामाईन गुजरातमधून आणल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, मालमत्ता गुन्हे कक्षाचे पथक गुजरातला रवाना झाले. चौकशीदरम्यान वापी येथील एका कंपनीमध्ये प्रॉडक्शन ट्रेनी केमिस्ट म्हणून काम करणारा मयूर पटेल या २४ वर्षीय युवकाला कंपनीमधून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयूर ६ जून २०२१ पासून संबंधित कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानेच तो काम करीत असलेल्या कंपनीमधून केटामाईन बाहेर काढून पोलिसांनी ठाण्यात अटक केलेल्या आरोपींना दिल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली. मयूर हा पूर्वी दुसऱ्या कंपनीमध्ये काम करीत होता.तिन्ही आरोपी पोलीस कोठडीतभारतातील काही ठराविकच कंपन्या केटामाईन तयार करीत असून, त्यातील एक कंपनी मयूर काम करीत असलेली आहे, असेही पोलिसांनी सांगितले. केटामाईन औषधामध्ये वापरले जाते. या कारवाईमध्ये जप्त केलेली कार प्रतीक याची आहे. प्रतीक आणि अक्रम या दोघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने वाढ केली असून, हे दोघे आणि मयूर या तिघांनाही आता न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

टॅग्स :PoliceपोलिसDrugsअमली पदार्थ